राज्यात मुंबईपाठोपाठ मालेगाव, भिवंडी, ठाणे, वसई-विरार, पनवेल तसेच नवी मुंबईत गोवरचे रुग्ण वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी शुक्रवारी गोवर परिस्थितीबाबत आढावा बैठक घेत राज्यातील सर्व जिल्हा आणि महानगरपालिकांना मार्गदर्शक सूचना दिल्या. या बैठकीत त्यांनी मुंबई, भिवंडी, मालेगाव, ठाणे, वसई-विरार, पनवेल, औरंगाबाद या महानगरपालिकेच्या आयुक्तांनी व अधिका-यांनी या बैठकीला हजेरी लावली.
आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खांदारे यांच्या अध्यक्षतेखालीही शुक्रवारी राज्यस्तरीय टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मनुष्यबळ तसेच इतर सरकारी विभागांकडूनही साहाय्य मिळणे आवश्यक असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
टास्क फोर्सच्या बैठकीतील मुद्दे –
० गोवर प्रतिबंधासाठी आरोग्य विभागाला महिला व बालविकास, शिक्षण, नागरी विकास, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक व्यवहार, आदिवासी कल्याण, ग्रामीण विकास व पंचायती राज, अन्न आणि शेती आणि संरक्षण या विभागांकडून अपेक्षित मदतीबाबत सूची टास्क फोर्सच्या बैठकीत निश्चित झाली
० एनसीसी, एनवायके आणि एनएसएस या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या समूहाकडून स्वयंसेवक घ्यावेत
० आयएमए, निमा तसेच आयपी यांसारख्या संस्थांकडूनही मदत घेतली जावी
० लसीकरण आणि सर्व्हेक्षण कृती आराखड्यातून गोवर प्रतिबंधात्मक योजना ठरवल्या
० वंचित बालकांचे लसीकरण पूर्ण केले जावे, अ जीवनसत्त्वाची पूरक मात्रा उद्रेक झालेल्या क्षेत्रातील बालकांना तातडीने द्या, लसीकरण तसेच अ जीवनसत्त्वाची मात्रा कुपोषित बालकांना प्राधान्याने द्यावी
० गोवरची लागण झालेल्या रुग्णांना खासगी रुग्णालयात आठवडाभर विलगीकरणात ठेवले जावे
लसीकरण कृती आणि सर्व्हेक्षण आराखड्यातील ठरलेले मुद्दे –
- ० जिल्ह आणि तालुका स्तरावरील अधिका-यांना गोवर-रुबेला लसीकरणाबाबत आवश्यक कृती आराखड्याची माहिती देणे
- ० गोवर-रुबेला निर्मूलीकरणाबाबत जिल्हा-उपजिल्हा टास्क फोर्सच्या बैठकीला सुरुवात करणे
- ० उद्रेक झालेल्या भागांत विशेष लसीकरण कार्यक्रम घेणे
- ० अतिजोखमीच्या व्यक्तींना प्राधान्य द्या
- ० बालवाड्या, पाळणाघरांतील मुलांना याअगोदर लसीकरण झाले का, याची तपशीलवार माहिती घेणे
- ० मध्यम, अतीजोखमीच्या जिल्ह्यांसाठी सूचना –
- अतिजोखमीच्या तसेच उद्रेक सुरु झालेल्या जिल्ह्यांतील पाच वर्षांखालील बालके शोधा
- गोवरचा उद्रेक झालेल्या क्षेत्रात प्रादुर्भावाची सद्यस्थिती लक्षात घेत पुरेशी लसीकरण मोहिम राबवली जात आहे का याबाबत गोवर-रुबेल-कॅच मोहिम राबवा
- अतिजोखमीच्या क्षेत्रातील परिस्थितीचा साप्ताहिक तसेच मध्यम जोखमीच्या क्षेत्रात मासिक आढावा घ्या
- ० कृती आराखड्यात निश्चित झाल्याप्रमाणे राज्यात गोवरच्या सद्यस्थितीबाबत नियमित आढावा घेतला जाईल
- ० गोवर, रुबेला या आजारांचे तसेच क्षेत्राचे ट्रेकिंग करणे