सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील हेळवाक येथे रात्री कुत्र्याचा पाठलाग करत बिबट्या चक्क एका घरात शिरला. सुधीर कारंडे यांच्या राहत्या घरात बिबट्या रात्री साडेदहाच्या सुमारास शिरला. सुदैवाने घरातील सर्व सदस्य देवीच्या विसर्जनासाठी घराबाहेर होती, त्यामुळे घातपात टळला.
(हेही वाचा – ‘मी तुमच्या गटाचा’… शिंदे गटात सामिल झाल्याच्या चर्चांवर अवधूत गुप्तेंची पोस्ट)
बिबट्या घरात शिरतानाचे सुधीर कारंडे यांनी स्वतः पाहिले आणि घराचा दरवाजा बंद केला. कारंडे यांनी प्रसंगावधानता दाखवल्याने घातपात टळला. याबाबत माहिती मिळताच वनविभागाची वन्यजीव बचाव पथकाची टीम घटनास्थळी तातडीने पोहोचली. रात्री उशिरापर्यंत बिबट्याला जेरबंद करण्याचे काम वनाधिकाऱ्यांच्या टीमकडून सुरु होते.
साधारणतः वर्षभराच्या बिबट्याच्या एका डोळ्याला मोतीबिंदू झाल्यासारखे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. हा बिबट्या एका पायाने लंगडतही होता. ही कारवाई विभागीय वनाधिकारी विशाल माळी, सहायक वनसंरक्षक तुषार ढमढेरे, वनक्षेत्रपाल संदीप जोपाळे, वनक्षेत्रपाल संदीप कुंभार यांनी केली.
Join Our WhatsApp Community