MSRTC: एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड? बोनस जाहीर होण्याची शक्यता

106

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त बोनस जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज, शुक्रवारी परिवहन विभागाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनस बाबत घोषणा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत आज मंत्रालयात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. दुपारी १ वाजता ही बैठक होणार असून कर्मचाऱ्यांचे पगार आणि तोट्यातील एसटी फायद्यात आणण्यासाठी करायच्या उपाययोजना याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे.

(हेही वाचा – NCB ची मोठी कारवाई: मुंबईतल्या गोडाऊनमधून 100 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त)

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी एसटी मंडळाला महिन्याला अडीचशे कोटी रूपयांची गरज असते आणि सरकारकडून महामंडळाला १०० कोटी रूपयांचा निधी लागतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पीएफचा हफ्ता देखील रखडला आहे. या संदर्भात ही बैठक महत्त्वाची असणार आहे. दरम्यान, मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर झाला आहे. यासह रेल्वे कर्मचाऱ्यांनाही मोठा बोनस जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा चांगला बोनस एसटी कर्मचाऱ्यांनाही मिळेल अशी अपेक्षा एसटी कर्मचाऱ्यांना आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.