समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून मिळाली तारीख

193

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून, त्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून तारीख मिळाली आहे. त्यामुळे नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा दिवाळीपूर्वी खुला करण्यासाठी राज्य सरकारकडून नियोजन केले जात असल्याची माहिती मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

दोन तारखा पंतप्रधान कार्यालयाकडून मिळाल्या

शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर येताच समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधानांना बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला १५ ऑगस्टला उद्घाटनाची तयारी करण्यात आली. परंतु, काही तांत्रिक कारणांमुळे रखडपट्टी झाली. त्यामुळे आता नागपूर ते शेलूबाजर ऐवजी नागपूर ते शिर्डी अशा मोठ्या टप्प्याचे एकत्रित उद्घाटन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी पंतप्रधानांची वेळ मागण्यात आली असून, १६ आणि २३ ऑक्टोबर अशा दोन तारखा पंतप्रधान कार्यालयाकडून मिळाल्याचे कळते. मात्र, यासंदर्भात वेळ निश्तितीसंदर्भात लेखी पत्र मिळाल्यानंतरच यासंबंधीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

(हेही वाचा शरद पवारांच्या घरावर हल्ला करणारे ११८ बडतर्फ एसटी कर्मचारी पुन्हा सेवेत)

दिवाळीआधी सुरू करण्यासाठी प्रयत्न

नागपूर ते शेलू बाजारऐवजी आता नागपूर ते शिर्डी असा मोठा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून १६ आणि २३ ऑक्टोबर अशा दोन तारखा मिळाल्या आहेत. १६ ऑक्टोबरला उद्घाटन केल्यास मुंबईतून गावी दिवाळीत जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळेल. त्यामुळे १६ ऑक्टोबरसाठी उपमुख्यमंत्री आग्रही असल्याचे कळते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.