इराणमधील महसा आमिनीचे वास्तव जगासमोर आणणा-या महिला पत्रकाराला अटक

134

इराणमधील हिजाबविरोधी चळवळीचे वार्तांकन करणारी महिला पत्रकार सध्या अटकेत आहे. इराणमधील महिला अधिकार विषयक पत्रकार निलोफर हमिदी यांनी महसा अमिनी या तरुणीची बातमी सर्वात पहिल्यांदा जनतेसमोर आणली. महसा आमिनी या तरुणीचा पोलीस कोठडीत असताना मृत्यू झाला. हिजाब परिधान केला नसल्यामुळे या तरुणीला अटक करण्यात आली होती. त्यावेळी निलोफर हमिदी या महिला पत्रकाराने ही बातमी जगासमोर आणली. यामुळे इराणमधील परिस्थितीचे वास्तव जगासमोर आले.

पत्रकार निलोफर हमिदी यांना अटक

पोलिसांच्या अटकेत असलेल्या महसा आमिनीचा मृत्यू झाला. तीन दिवस पोलीस कोठडीत असलेल्या महसा आमिनीला जखमी अवस्थेत तेहरान येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी महसाचे आईवडील आणि भाऊ एकमेकांना बिलगून रडत असतानाचा फोटो पत्रकार निलोफर यांनी काढला. हा फोटो नंतर जगासमोर आला. उपचारादरम्यान, या 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. पोलिसांनी बेदम मारहाण केल्यामुळे महसाचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला. इथूनच पुढे इराणमधील हिजाब विरोधी चळवळीला सुरुवात झाली. पण अन्यायाविरोधात लढणा-या पत्रकार निलोफर हमिदी यांना अटक करण्यात आली आहे.

( हेही वाचा: पुण्यात प्रवाशांनी भरलेल्या खासगी बसने घेतला पेट )

आणखी 28 पत्रकार अटकेत

निलोफर यांनी महसाचा फोटो ट्वीट केला होता. त्यानंतर त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरही बंदी घालण्यात आली. त्यांच्या घरावर छापे टाकण्यात आले. त्यांच्या घरुन काही सामान जप्त केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. निलोफर यांच्यासोबत आणखी 28 पत्रकारांना अटक करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.