ठाण्यात तरुणीचा विनयभंग करत तिला फरफटत नेणारा मुजोर रिक्षावाला अखेर गजाआड

224

ठाण्यात मुलीला फरफटत नेणा-या रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. दारुच्या नशेत हे कृत्य केल्याची कबुली आरोपी रिक्षाचालकाने दिली आहे. शुक्रवारी सकाळी 7 वाजता एक विद्यार्थिनी बाजारपेठेत पायी जात असताना रिक्षा चालकाने तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव केले. मुलीने त्याला जाब विचारल्यानंतर रिक्षाचालकाने तिचा हात पकडून फरफटत नेले. पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर दिघा भागात राहणा-या या रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

शुक्रवारी सकाळी 7 वाजता ही तरुणी बाजारपेठेत पायी जात होती. त्याचवेळी एक रिक्षा चालक त्याची रिक्षा घेऊन जात होता. या रिक्षा चालकाने तरुणीकडे पाहून अश्लील हावभाव केले. या प्रकारानंतर तरुणीने धाडस दाखवत रिक्षा चालकाला जाब विचारला. तसेच, त्याला रिक्षातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु रिक्षा चालकाने रिक्षा सुरु केली. त्याने तरुणीला फरफटत काही अंतर पुढे नेले. तरुणीच्या हाताला दुखापत झाल्याने ती रस्त्यात पडली. त्यानंतर रिक्षाचालक स्थानकाच्या दिशेने फरार झाला. दरम्यान, या घटनेचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यामध्ये कैद झाला आहे. ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी भाजपचे माजी नगरसेवक संजय वाघुले त्या परिसरात होते. संपूर्ण प्रकरण लक्षात आल्यानंतर त्यांनी ताबडतोब पोलिसांशी पाठपुरावा करुन सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे जमा केले. त्यानंतर या तरुणीने ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी रिक्षाचा नंबर मिळवला आणि रिक्षाचालकाचा शोध सुरु केला. अखेर  रिक्षा चालकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

24 तासांच्या आत आरोपी अटकेत 

दरम्यान, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करत, ठाणे पोलिसांचे आभार मानले आहेत. तसेच, राज्यात शिंदे- फडणवीस शिवसेना भाजप सरकार आहे. येथे मुलींकडे वाकड्या नजरेने पाहणा-यांची गय केली जाणार नाही. 24 तासांच्या आता त्या मुजोर रिक्षाचालकाला अटक करण्यात आल्याचे ट्वीट चित्रा वाघ यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.