संपूर्ण मुंबईत मंगळवारी आणि बुधवारी दहा टक्के पाणी कपात

80

मुंबईला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या धरणांपैकी भातसा धरणातील पाणी पिसे बंधाऱ्यावर अडवले जाते. या पिसे बंधाऱ्याच्या ठिकाणी तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने तातडीने तेथील कामे हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या मंगळवारी व बुधवारी अनुक्रमे १८ ते १९ ऑक्टोबरच्या कालावधीमध्ये संपूर्ण मुंबईमध्ये दहा टक्के पाणी कपात होणार असल्याची माहिती जलअभियंता विभागाने दिली आहे.

( हेही वाचा : अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच; लटकेंसह ७ उमेदवारांमध्ये होणार लढत )

मुंबईला दरदिवशी विविध धरण तसेच तलावांमधून ३८५ कोटी लिटर अर्थात ३८५० दशलक्ष लिटर एवढा पाण्याचा पुरवठा होत असतो. या पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांपैकी पिसे बंधाऱ्याच्या न्यूमॅटिक गेटच्या देखभालीचे काम होती घेण्यात येणार आहे. पावसाळा कालावधीनंतर सालाबादप्रमाणे ‘न्यूमॅटिक गेट’चे परिरक्षण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्यामुळे पिसे बंधाऱ्यातील पाण्याची पातळी ही साधारणत: ३१ मीटर राखणे आवश्यक असते. या वर्षी पावसाळा लांबल्यामुळे हे काम लवकर हाती घेता आले नाही. पाण्याची पातळी वाढविण्यासाठी पिसे बंधाऱ्याच्या परिरक्षणाचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. यानुसार याच्या देखभालीचे काम हाती घेण्यात येत असल्यामुळे मंगळवारी १८ व बुधवारी १९ ऑक्टोबर २०२२ रोजी मुंबई शहर व उपनगरात १० टक्के पाणी कपात करण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.

या पिसे बंधाऱ्याच्या ‘न्यूमॅटिक गेट’च्या देखभालीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने या कालावधीमध्ये मुंबईतील शहर व उपनगरांमधील काही परिसरांमधील पाणी पुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन जनतेने पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे करण्यात आले आहे. भातसा धरणात सोडले जाणारे पाणी पिसे बंधाऱ्याला अडवून तेथीलच जलशुध्दीकरण करून मुंबईकरांना शुध्द पाण्याचा पुरवठा केला जातो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.