दिवाळीत अनलिमिटेड मनोरंजन; फक्त ५९ रुपयांमध्ये मिळवा १५हून अधिक OTT अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन

217

ओटीटी प्लॅटफॉर्म दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहेत. मोठ्या पडद्यावर सिनेमा पाहण्यापेक्षा अलिकडे प्रेक्षक ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट, वेबसिरिज पाहतात. लवकरच दिवाळी सुट्ट्या सुरू होणार आहे. या सुट्ट्यांमध्ये तुमच्याकडे काही करमणुकीचे साधन नसेल तर तुम्ही अगदी स्वस्त किंमतींमध्ये ओटीटी अ‍ॅपचे सब्सक्रिप्शन घेऊ शकता. अवघ्या ५९ रुपयांमध्ये तुम्हाला डिज्नी+हॉटस्टार ( Disney+Hotstar), झी५ (Zee5) आणि सोनीलिव (SonyLIV) सारख्या २५ ओटीटी अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळते.

( हेही वाचा : मुंबईतील ‘या’ तीन ठिकाणी बॉम्बस्फोट घडवणार; पोलिसांच्या हेल्पलाईन क्रमांकावर धमकीचा फोन)

५९ रुपयांमध्ये ओटीटी अ‍ॅपचे सब्सक्रिफ्शन कसे घ्याल?

टाटा प्लेचा ओटीटी अ‍ॅप आहे. टाटा प्ले आधी टाटा स्काय या नावाने ओळखले जायचे. ओटीटी अ‍ॅपचे सब्सक्रिप्शन मिळवण्यासाठी युजरला सर्वप्रथम टाटा प्ले बिंज अ‍ॅप (Tata Play Binge App) डाऊनलोड करावे लागेल. या अ‍ॅपमध्ये तुम्हाला २५ ओटीटी अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणार आहे.

५९ रुपये भरून तुम्हाला टाटा प्ले बिंज अ‍ॅप (Tata Play Binge App)या अ‍ॅपची मेंबरशीप घ्यावी लागेल. सर्व स्मार्टफोन युजर्स याचा वापर करू शकतात. यामध्ये ५९ रुपये भरून तुम्हाला जवळपास २५ ओटीटी प्लॅटफॉर्मचा अ‍ॅक्सेस मिळू शकतो. दर महिन्याला ५९ रुपये भरावे लागतील.

टाटा प्ले बिंज अ‍ॅपमध्ये हे ओटीटी प्लॅटफॉर्म पाहता येतील…

  1. डिज्नी+हॉटस्टार ( Disney+Hotstar)
  2. झी5 ( Zee5)
  3. सोनीलिव (Sony LIV)
  4. एमएक्स प्लेयर (MX player)
  5. होईचोई
  6. नम्मा फ्लिक्स
  7. चौपाल
  8. प्लॅनेट मराठी ( Planet Marathi)
  9. एरॉस नाऊ ( Eros Now)
  10. सन एनएक्सटी ( Sun NXT)
  11. Voot Select
  12. Voot Kids
  13. हंगामा प्लान
  14. शेमारूमी ( ShemarooMe)
  15. एपीकॉन (EPICON)
  16. डॉक्यूबे ( DocuBay)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.