PFI च्या पदाधिका-यांसह तिघांना पनवेल येथून अटक

138

केंद्र सरकारने बंदी घातलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेच्या एका पदाधिकाऱ्यासह तिघांना पनवेल येथून एटीएसने अटक केली आहे. या तिघांपैकी एक जण पीएफआय या संघटनेचा सेक्रेटरी असल्याची माहिती एटीएसने दिली आहे.

‘देशातील दहशतवादी कारवायांमध्ये कथितपणे सहभागी असल्याच्या कारणावरून एनआयए ने पीएफआय विरुद्धच्या मोहिमेचा भाग म्हणून सप्टेंबरमध्ये १५ राज्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकून १०० हून अधिक पीएफआयचे नेते आणि कार्यकर्त्यांना अटक केली होती.  नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ ह्युमन राइट्स ऑर्गनायझेशन, रिहॅब इंडिया फाऊंडेशन आणि ऑल इंडिया इमाम्स कौन्सिलसह पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि त्याच्या संलग्न संघटनांवर केंद्र सरकारने दहशतवादात सहभाग असल्याच्या संशयावरून ५ वर्षांसाठी बंदी घातली. महाराष्ट्र एटीएसने राज्यातील अनेक जिल्ह्यात छापे मारी करून पीएफआयच्या अनेक पदाधिकारी आणि सदस्यांना अटक केली होती.
( हेही वाचा: Diwali 2022: ‘अशी” करा दिवाळीत ‘Smart Shopping’ )

देशविरोधी कट आखण्यासाठी बैठका
दरम्यान बंदी घालण्यात आलेल्या पीएफआय या संघटनेचा पदाधिकारी आणि काही सदस्य पनवेल या ठिकाणी गुप्त बैठका घेत असल्याची माहिती महाराष्ट्र एटीएसला मिळाली होती. या महितीच्या आधारे, एटीएसने बुधवारी पनवेल येथून पीएफआय संघटनेचा स्टेट एक्सपान्शन कमिटीचा सदस्य आणि पनवेल शहर सेक्रेटरी असे एकूण तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिघे बंदी घालण्यात आलेल्या पीएफआयच्या पदाधिकारी आणि सदस्य यांना एकत्रित करून देशविरोधी कारवाई करण्याचा कट करण्यासाठी बैठका घेत होते, अशी माहिती समोर येत आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.