कोरोनानंतर ही पहिली निर्बंधमुक्त दिवाळी असणार आहे. पण यंदाच्या दिवाळीत दिल्ली शहरात फटाके फोडलात तर तुरुंगवास तर घडेलच पण दंडही ठोठावला जाऊ शकतो. त्यामुळे येथील शहरवासियांना राज्य सरकारने, दिवा लावा, पण फटाके फोडू नका, असे आवाहन केले आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी दिल्लीवासियांसाठी महागात पडू शकते. पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी बुधवारी नागरिकांना फटाके न फोडण्याचे आवाहन केले आहे. दिल्लीत फटाके फोडल्यास 6 महिन्यांचा तुरुंगवास आणि 200 रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे.
दिल्ली सरकारने अधिनियमाच्या कलम 9B नुसार, राजधानी परिसरात फटाक्यांचे उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर बंदी घातली आहे. त्याचे उल्लंघन झाल्यास 5 हजार रुपयांपर्यंत दंड लागेल आणि तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होईल.
मुंबईत विनापरवाना फटाके विकल्यास कारवाई
मुंबई पोलीस दिवाळी सणाच्या तोंडावर सजग झाले आहेत. त्यांनी विना परवाना फटाक्यांची विक्री केल्यास कडक कारवाईचा इशारा दिला आहे. मुंबई शहरात विना परवाना फटाक्यांची विक्री केल्यास दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
( हेही वाचा: महिलांना भरावा लागतो ‘पिंक टॅक्स’; समान वस्तू आणि सेवांसाठी जास्तीचे पैसे, काय आहे कारण… )
राज्य सरकार 51 हजार दिवे लावणार
मागच्या दोन वर्षांपासून दिल्लीत फटाके उत्पादन, साठवणूक आणि विक्रीविरोधात राज्य सरकार कारवाई करत आहे. तसेच, सरकारने 21 ऑक्टोबर रोजी नागरिकांसाठी जागरुकता अभियान सुरु केले आहे. त्यानुसार, दिवे लावा, फटाके नाही,असे अभियान राबवण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत राज्य सरकार कॅनाॅट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये 51 हजार दिवे लावणार आहे. तर फटाके फोडणा-यांवर कारवाई केली जाणार आहे.
Join Our WhatsApp Community