मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दोन दिवसीय पुणे दौऱ्यात मनसेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग होताना दिसणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी मनसेत प्रवेश करणार आहेत. पुणे महानगर पालिका, मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर महत्वाच्या महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचे महाराष्ट्रातील दौरे देखील वाढले आहेत.
(हेही वाचा – पाकिस्तान सीमेजवळ भारत उभारणार एअरबेस; गुजरातमध्ये 4500 एकर जागेवर एअर फोर्स स्टेशन)
मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. खडकवासला, भोर, वेल्हा आणि मुळशीतील काही पदाधिकारी मनसेमध्ये प्रवेश करणार आहेत.
वसंत मोरे यांच्याकडे बारामती लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. गुरूवारी पुण्यात राज ठाकरे दाखल झाले असून या ठिकाणी ते पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघाकडे मनसेने विशेष लक्ष केंद्रित केल्याने या मतदारसंघाची जबाबदारी वसंत मोरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. यावेळी मनसेत मोठ्या प्रमाणावर प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडून मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे.