एमसीएच्या निवडणुकीत पवार-शेलार पॅनलचे अमोल काळे विजयी, संदीप पाटील यांचा केला पराभव

99

मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीएच्या बहुचर्चित निवडणुकीचे निकाल आता समोर आले आहेत. या निवडणुकीला गेल्या काही दिवसांपासून राजकीय रंग मिळत होते. पण अखेर या निवडणुकीत शरद पवार आणि आशिष शेलार पॅनलचे अमोल काळे विजयी झाले आहेत. त्यामुळे आता एमसीएच्या अध्यक्षपदाची धुरा ही अमोल काळे यांच्या खांद्यावर असणार आहे. या निकालामुळे तब्बल 11 वर्षांनंतर राजकीय व्यक्ती एमसीएच्या अध्यक्षपदी विराजमान झाली आहे.

संदीप पाटील यांचा पराभव

अमोल काळे यांनी भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा या निवडणुकीत 23 मतांनी पराभव केला आहे. अमोल काळे यांना 181 तर संदीप पाटील यांना 158 मते मिळाली आहेत. अमोल काळे हे उद्योगपती असून एमसीएचे उपाध्यक्षपद देखील त्यांच्याकडे होते. तसेच काळे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय देखील मानले जातात. या विजयानंतर काळे यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष करायला सुरुवात केली आहे.

mca 2

सचिवपदी अजिंक्य नाईक विजयी

दरम्यान, याबाबत संदीप पाटील यांनी अमोल काळे यांचे अभिनंदन केले असून मुंबई क्रिकेटच्या विकासासाठी त्यांनी उत्तम काम करण्याच्या शुभेच्छाही त्यांना दिल्या आहेत. तसेच एमसीएच्या सचिवपदी पवार-शेलार पॅनलचेच अजिंक्य नाईक हे देखील विजयी झाले आहेत. नाईक यांनी ऐतिहासिक अशी सर्वाधिक 286 मते मिळवत मयांक खांडवाला आमि नील सावंत यांचा त्यांनी पराभव केला आहे. तर अरमान मलिक हे एमसीएच्या खजिनदारपदी निवडून आले आहेत. अवघ्या एका मताने त्यांना हा विजय मिळाला आहे. जगदीश आचरेकर यांना 161 तर अरमान मलिक यांना 162 मतं मिळाली आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.