देशाच्या उद्योग जगात परोपकार जपण्यात अग्रस्थानी असलेले अझीम प्रेमजी यांना मागे टाकत यंदा एचसीएल टेकचे संस्थापक शिव नाडर यांनी 1 हजार 161 कोटी रुपयांच्या वार्षिक देणगीसह देशातील सर्वात दानशूर व्यक्ती म्हणून अव्वल स्थान पटकावले आहे. भारतातील परोपकारकर्त्यांची 2022 सालाची यादी एडेलगिव्ह हुरुन यांनी संयुक्त सर्वेक्षणांअंती गुरुवारी प्रसिद्ध केली. हुरुनच्या यादीत असलेल्या उद्योजकांनी दररोज सरासरी 3 कोटी रुपये दान दिले आहेत. शिक्षण, आरोग्य सेवा, सामाजिक तसेच आपत्ती काळातील मदत या प्रमुख कारणांसाठी मदत देण्यात आली आहे.
( हेही वाचा: राज्यातील पोलीस दलात बदल्यांचे वारे; २५ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या )
कोणी किती केले दान?
- शिव नाडर यांनी गेल्या 3 वर्षांमध्ये 3 हजार 219 कोटींची मदत केली.
- माईंडट्रीचे सुष्मिता व सुब्रोतो बागची आणि राधा व एन. एस. पार्थसारथी हे 5 व्या स्थानी आहेत. त्यांना प्रथमच यादीत स्थान मिळाले आहे.
- अझीम प्रेमजी आणि कुटुंबियांनी केलेल्या देणग्यांमध्ये यावेळी 95 टक्के घट झाली असली, तरी 3 वर्षांमध्ये 18 हजार 101 कोटी रुपये दान केले आहे.
- मुकेश अंबानी रिलायन्स उद्योग समूह व कुटुंबिय तिस-या स्थानी कायम आहेत. त्यांनी 411 कोटींचे दान केले आहे. त्यात यावेळी 29 टक्के घट झाली आहे.
- कुमार मंगलम बिर्ला व कुटुंबियांनी 242 कोटी रुपयांचे दान केले आहे. मात्र, यंदा त्यात 36 टक्के घट झाली आहे.