के.जे. सोमय्या काॅलेज आॅफ आर्ट्स अॅण्ड काॅमर्स या महाविद्यालयाच्या सोमय्या फाॅर पर्फोर्मींग आर्टतर्फे व्यंगचित्रकार आणि छायाचित्रकार प्रदीप म्हापसेकर यांनी मोबाईलने टिपलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. मोबाईमध्ये काढलेले सुंदर फोटो आणि त्यांना दिलेले अफलातून कॅप्शन हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य होते. या प्रदर्शनात म्हापसेकर यांनी टिपलेल्या 350 छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.
मोबाईलमधील फोटोग्राफी म्हणजे छायाचित्रकारितेतील अक्षरओळख असे म्हटले जाते. आपल्या हातात असणा-या मोबाईलचा वापर आपला छंद जोपासण्यासाठी म्हापसेकर यांनी केला. आपण सगळेच ही दृष्ये दैनंदिन आयुष्यात पाहत असतो, परंतु जे म्हापसेकर यांच्या दृष्टीने टीपले ते अप्रतिम आहे.
हे प्रदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक कार्यशाळा
सोमय्या काॅलेजचे संस्कृत विभागाचे असिस्टंट प्रोफेसर डाॅ. प्रसाद भिडे यांनी या प्रदर्शनीबद्दल सांगितले की, प्रदीप म्हापसेकर यांनी मोबाईलमधून टिपलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले. विद्यार्थ्यांना या प्रदर्शनाची मांडणी करताना एक वेगळा अनुभव आला. एक एक चित्र भिंतीवर चिटकवत असताना, आपल्या आजूबाजूला दिसणा-या जगात एक फ्रेम दडलेली असू शकते हे विद्यार्थ्यांना कळले. विशेष म्हणजे, प्रत्येक चित्राच्याखाली प्रदीप म्हापसेकर यांनी दिलेले शिर्षक त्यातून कलाकाराची जी एक दृष्टी असते, ती दृष्टी इथल्या विद्यार्थ्यांना मिळायला मदत झाली. त्यामुळे हे प्रदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक कार्यशाळा होती, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, असे भिडे यांनी सांगितले.
( हेही वाचा: ‘हे’ आहेत देशातील टाॅप 10 दानशूर व्यक्ती; शीव नाडर देशातील सर्वाधिक दानशूर )
View this post on Instagram
सोमय्या काॅलजचे आभार
एक कलाकार असल्याने पेंटिंग आणि इतर कला जोपासत असताना मला अवतीभवती अशी काही दृष्ये दिसायची जी मी मोबाईलच्या कॅमे-यात टिपायला सुरुवात केली आणि ही छायाचित्रे मी फेसबुकवर पोस्ट करायला लागलो. या चित्रांना लोकांकडून खूप प्रतिसाद मिळाला. कमेंट्स येऊ लागल्या. त्यानंतर सोमय्या काॅलेजने मला छायाचित्रांच्या प्रदर्शनासाठी बोलवले. या महाविद्यालयातील मुलांनी फोटोंचे प्रींट काढून त्याची प्रदर्शनी भरवली. मी या महाविद्यालयाचा आभारी आहे, असे प्रदीप म्हापसेकर म्हणाले.
Join Our WhatsApp Community