‘पार्टी पॅक’ इन्स्टाग्रामवरील ऑनलाइन ड्रग्स विक्रीचा ग्रुप

121

सोशल मीडिया प्लॅटफार्मचा वापर करून ड्रग्सची विक्री व तस्करी करणाऱ्या टोळ्या देशभरात कार्यरत आहेत. या टोळ्या सोशल मीडियाचा आधार घेऊन देशभरात ड्रग्स पुरवठा व त्याची विक्री मोठ्या प्रमाणात करीत असल्याचा धक्कादायक प्रकार एनसीबीच्या एका कारवाईत समोर आला आहे. एनसीबीने मुंबईतून ड्रग्ससह अटक केलेल्या भगत नावाच्या व्यक्तीच्या चौकशीत इन्स्टाग्राम या सोशल माध्यामावरील ‘पार्टी पॅक’ गृप चालविणाऱ्याचे नाव व त्याची कार्यपद्धती समोर आली आहे.

( हेही वाचा : आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्यांचा शिंदे-फडणवीसांकडून ‘सन्मान’; उद्धव ठाकरेंनी केली होती योजना बंद)

अलेक्स.व्ही नावाचा व्यक्ती ड्रग्सच्या सिंडिकेटमध्ये सामील असून त्याने इन्स्टाग्रामवर पार्टीपॅक नावाचा ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपमध्ये देशभरातील तसेच देशाच्या बाहेरील अनेक ड्रग्स तस्कर, विक्री करणारे आणि ड्रग्स सेवन करणारे असल्याची माहिती समोर आली आहे. एनसीबीने देशभरात राबविलेल्या ड्रग्सविरोधी मोहिमेचा भाग म्हणून काही दिवसांपूर्वी मुंबईतून एस. भगत नावाच्या व्यक्तीला अटक करून त्याच्या जवळून एलएसडी, हॅश ऑइल ,एमडी इत्यादी अमली पदार्थ जप्त केला आहे.

भगतच्या चौकशीत एनसीबीला देशभरात चालणाऱ्या ड्रग्स सिंडिकेटबाबत महत्वाची माहिती मिळाली. ड्रग्स सिंडिकेटचा भाग असलेला मुंबईस्थित अलेक्स.व्ही नावाच्या माहिती एनसीबीच्या हाती लागली, दिल्ली, गुजरात, आंध्र प्रदेश, गोवा, महाराष्ट्र इत्यादीसारख्या अनेक राज्यांमध्ये पसरलेल्या सोशल मीडियावर आधारित अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या सिंडिकेटमध्ये अलेक्स.व्ही हा गुंतलेला असून व्यक्ती “_PARTY_PACK_” नावाचा इन्स्टाग्राम त्याने एक ग्रुप बनवला आहे. हा ड्रग्स तस्करीत सक्रियपणे गुंतलेला होता. गेल्या आठवड्यात एनसीबीने अलेक्स .व्ही याला अटक केली आहे, त्याने एनसीबीला दिलेल्या कबुलीत ऑनलाइन आधारित ड्रग सिंडिकेटचा निर्माता तोच असल्याची कबुली दिली. तपासादरम्यान, हे उघड झाले की अॅलेक्सने सिंडिकेट व्यक्तींना ड्रग्स देखील पुरवल्या होत्या ज्याचा नुकताच विशाखापट्टणम पोलिसांनी पर्दाफाश केला होता. याचे बहुतांश सदस्य ऑनलाइन मीडिया प्लॅटफॉर्मची उपस्थिती असलेले तरुण असल्याने, सदस्यांना संपूर्ण भारतातील बाजारपेठेसह रिअल टाइममध्ये ऑनलाइन अॅप्सद्वारे ऑर्डर करणे आणि पैसे देणे तुलनेने सोपे होते अशी माहिती तपासात समोर आली आहे. ऑनलाइन ड्रग्स सिंडिकेटमध्ये सहभागी असलेल्या इतरांची माहिती काढण्यात येत असून लवकरच ऑनलाइन सिंडिकेट उध्वस्त करू असा विश्वास एनसीबीने व्यक्त केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.