परदेशात पेमेंट कसे करावे, आर्थिक चलनाबाबत काय प्रक्रिया आहे याबाबत आपल्याला माहिती नसते परंतु आता चिंता करण्याची गरज नाही कारण, तुम्हाला UPI द्वारे आपल्या भारतीय बॅंक खात्यांमधून पेमेंट करता येणार आहे. युरोपमध्ये सुद्दा आता UPI प्रणाली सुरू झाली आहे. यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन आपल्या आंतरराष्ट्रीय शाखेशी करार करण्यात आला आहे.
( हेही वाचा : बदलापूरमध्ये कोंडेश्वर मंदिराजवळील धबधब्यात ४ मुलं बुडाली)
UPI युरोपात कसे वापरता येईल?
- भारतीय बॅंकेशी UPI सेवा लिंक असणे गरजेचे आहे.
- तुमच्या मोबाईलमध्ये भीम UPI अॅप डाऊनलोड करा.
- जगभरात ही सेवा पॉसमध्ये ( पॉइंट ऑफ सेल) उपलब्ध असेल.
- UPI बरोबर एनपीसीआयच्या रूपे कार्डचा सुद्धा युरोपात वापर करता येईल.
- युरोपात यूपीआयचा वापर क्विक रिस्पॉन्स क्यूआर कोडच्या ( QR Code) साहाय्याने करावा लागेल.
- UPI च्या साहाय्याने पेमेंट केल्यावर त्यासाठी संबंधित देशातील चलनाप्रमाणे शुल्क आकारले जाईल.
युरोपात कुठे चालेल UPI सुविधा ?
- युरोपात बेनेल्क्स गटातील बेल्जियम, नेदरलॅंड्स व लक्झेंबर्ग या देशांमध्ये ही सेवा उपलब्ध होईल.
- स्वित्झर्लंडमध्ये यूपीआय सेवा लवकरच सुरू होईल.
या देशांमध्ये वापरता येईल UPI पेमेंट प्रणाली
- युरोप (नेदरलँड, बेल्जियम, लक्झेंबर्ग, स्वित्झर्लंड आणि फ्रान्स यासह सुरू करण्यासाठी)
- यूके
- युएई
- सिंगापूर
- मलेशिया
- थायलंड
- फिलीपिन्स
- व्हिएतनाम
- कंबोडिया
- हाँगकाँग
- तैवान
- दक्षिण कोरिया
- जपान
- ओमान
- भूतान
- नेपाळ