बेस्ट उपक्रमाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गेल्या सहा महिन्यांत विविध प्रलंबित मागण्यांसाठी अनेकवेळा आंदोलन केले आहे. आता पुन्हा एकदा ऐन दिवाळीत बेस्टच्या कंत्राटी चालकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सांताक्रुझ बेस्ट बस डेपोमधील शेकडो बस कर्मचारी अचानक संपावर गेले आहेत. या कंत्राटी कामगारांना नियमित सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रमाणे बोनस मिळालेला नाही. यांना २३ हजार ५०० सांगून १८५०० पगार देण्यात येतो, सुट्ट्यांबाबक निर्णय घेण्यात आला नाही अशा विविध मागण्यांसाटी हे कंत्राटी वाहक, चालक संपावर गेले आहेत. त्यामुळे पश्चिम उपनगरात दिवाळीसाठी आणि शनिवारी कामावर निघणाऱ्या चाकरमान्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
( हेही वाचा : परदेशी जाताना नो टेन्शन! भारताचे UPI पेमेंट या देशांमध्ये वापरता येणार; पहा संपूर्ण यादी )
दिवाळी बोनसच्या मागणीसाठी संप
समान वेतन आणि अन्य आवश्यक कोणत्याही सुविधा पुरवल्या जात नसल्याची तक्रार कंत्राटी कामगारांची आहे. तसेच वाहतुकीचे कंत्राट अन्य संस्थांना दिले तरी सध्याच्या कंत्राटी कामगारांना सेवेत नियमित केले जावे, बेस्टमधील कंत्राटी कामगारांना कामयस्वरूपी कर्मचाऱ्यांप्रमाणे दिवाळीपूर्वी बोनस दिला जावा, अधिकाऱ्यांपासून होणारा त्रास कमी व्हावा, पगारवाढ, जॉयनिंग लेटर या मागण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान ऐन दिवाळीत सांताक्रूझ डेपोमधील ३०० कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता आहे. या कामगारांशी संवाद साधण्याशी कंत्राटी कंपनीचे पदाधिकारी या कामगारांशी चर्चा करण्यासाठी दाखल झाले आहेत.
बेस्टच्या वाहक म्हणजेच कंडक्टरला १८ हजार ५०० रुपये पगार सांगितलेले मात्र त्यांना प्रत्यक्षात फक्त १२ हजार ६०० रुपये पगार दिला जातो. नोकरी देताना सहा तास काम करायचे सांगितले होते मात्र काम आठ तासांहून अधिक होते. त्याचा ओव्हर टाइमही मिळत नाही अशी तक्रार महिला कर्मचाऱ्यांनी केली आहे.
कर्मचारी आंदोलनावर ठाम
जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या होत नाहीत तसेच या मागण्या मान्य केल्याचे लिखित पत्र दिले जात नाही तोपर्यंत कंत्राटी कर्मचारी हे आंदोलन सुरू ठेवणार आहेत असे एका कर्मचाऱ्याने माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
Join Our WhatsApp Community