Halal Product:” हलाल मुक्त दिवाळी अभियान” आहे तरी काय?

182

सध्या सर्वत्र दिवाळीचे वातावरण तयार झाले आहे. अनेकांची दिवाळीची शाॅपिंग सुरु आहे. तर बहुतांश लोक दिवाळीच्या सुट्ट्यांची प्लॅनिंग करत आहेत. सोशल मीडियावरदेखील दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टींची धूम आहे. सध्या ट्वीटरवर अनेक ट्रेंड सुरु आहेत. त्यातील एक म्हणजे हलाल मुक्त दिवाळी.

ट्विटरवर हलाल फूड विरोधात जोरदार टीका केली जात आहे. अनेक रेस्टाॅरंटमध्ये ग्राहकांना हलाल फूड खाण्यास दिले जाते, असे काही ट्वीटर युजर्सचे म्हणणे आहे. यातून हलाल फूड आणि उत्पादनांना विरोध करण्याचा ट्रेंड चर्चेत आला आहे. या ट्रेंडमध्ये युजर्सना हलाल उत्पादने घेऊ नका, वस्तूंवरील हलाल स्टॅम्प तपासून घ्या, असे सूचवले जात आहे. या आशयाचे ट्वीट केले जात आहेत. हलालशी निगडीत अर्थव्यवस्थेलाच या निमित्ताने विरोध केला जातो आहे. जर तुम्ही हलाल फूड विकत घेतले तर एकप्रकारे तुम्ही जिहादलाच हातभार लावाल, असेही काही ट्वीटमध्ये सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे हलाल प्रोडक्ट घेऊ नका आणि हलाल मुक्त दिवाळी साजरी करा, असे आवाहन केले जात आहे.

( हेही वाचा: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; प्लॅटफॉर्म तिकीट झाले पाचपट महाग )

हलाल अर्थव्यवस्था

हलाल व्यवसाय जगभरात अस्तित्त्वात आहेत. जगात अनेक प्रकारचे हलाल व्यवसाय आहेत. हलाल उत्पादनांची बाजारपेठ 2024 पर्यंत 2.5 ट्रिलियन डाॅलरवर जाण्याची अपेक्षा आहे. आता हलाल व्यवसायात अनेक वस्तू आणि सेवांचा समावेश आहे. हललाल म्हटले की, फक्त नाॅन वेज असे नाही, तर हलाल व्यवसाय अनेक प्रकारचा आहे. ज्यात अन्न, औषधे, सौंदर्य प्रसाधने, कपडे, पर्यटन सेवा, अकाउंटिंग, बॅंकिंग सेवा, वित्तीय सेवा यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.