अनिल परब यांना दणका; बांधकाम विभागाने साई रिसाॅर्ट पाडण्याची दिली जाहिरात

99

राज्याचे माजी परिवहन मंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांना राज्य सरकारने मोठा दणका दिला आहे. अनिल परब यांचे दापोलीतील साई रिसाॅर्ट पाडण्यात येणार आहे. हे रिसाॅर्ट पाडण्यासाठी राज्याच्या बांधकाम विभागाने स्थानिक वर्तमानपत्रातून जाहिरात दिली आहे. तसेच, तीन महिन्यात हे रिसाॅर्ट पाडण्यासाठी राज्याच्या बांधकाम विभागाने स्थानिक वर्तमानपत्रातून जाहिरात दिली आहे. तसेच, तीन महिन्यात हे रिसाॅर्ट पाडण्याचा कालावधी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे परब यांचे हे रिसाॅर्ट लवकरच जमीनदोस्त होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रत्नागिरीच्या दापोली येथे अनिल परब यांचे हे साई रिसाॅर्ट आहे. हे रिसाॅर्ट अनधिकृत असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. हे रिसाॅर्ट आपले नसल्याचे अनिल परब यांनी वारंवार स्पष्ट केले असले तरी हे रिसाॅर्ट परब यांचेच असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.

( हेही वाचा: Halal Product: हलाल मांस झटक्यापेक्षा वेगळे कसे? ते जाणून घ्या )

….म्हणून रिसाॅर्ट पाडले जाणार 

चिपळूणच्या बांधकाम विभागाकडून शनिवारी स्थानिक वर्तमानपत्र दैनिक तरुण भारतमध्ये टेंडर जाहिरात देण्यात आली आहे. साई रिसाॅर्ट पाडण्यासाठीची ही जाहिरात असून कंत्राटदारांना नोव्हेंबरपर्यंत टेंडर भरण्याचे आवाहन या जाहिरातीतून करण्यात आले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या बांधकामावर आक्षेप घेतला होता. पर्यावरणाच्या नियमांचे उल्लघंन करुन हे रिसाॅर्ट बांधण्यात आल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता. तसेच, हे रिसाॅर्ट पाडण्यासाठी सोमय्या यांनी दिल्लीपर्यंत पाठपुरावा केला होता. त्यानुसार हे रिसाॅर्ट पाडण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.