राज्यात कोरोना रुग्ण संख्या घटते, कोरोनमुक्त रुग्णांच्या संख्येत वाढ

130

राज्याच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, शनिवारी, ३ ऑगस्ट रोजी 1 हजार 771 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ७८, ४६, ६९४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.६ टक्के एवढे झाले आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के एवढा आहे.

सक्रीय रुग्ण किती?

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या ८ हजार ६९४ सक्रीय रुग्ण आहेत. सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबई ३,१८३, ठाणे २,००१ आणि पुण्यात १,६८१ रुग्ण आहेत. तर जळगावमध्ये तीन, हिंगोली आणि नंदूरबारमध्ये पाच पाच सक्रीय रुग्ण आहेत. राज्यात आज १ पोरी २७२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ३९४, नवी मुंबई १०८, पुणे मनपा १६६, पिंपरी चिंचवड मनपा १०८ रुग्ण आढळले आहेत.

(हेही वाचा अवघ्या १०-१५ दिवसांत खेतवाडीतील १५-२० फुटांच्या गणेशमूर्ती कशा उभ्या केल्या?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.