मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर 24 तासांत 2 भीषण अपघात; 12 जण जखमी

86

सायरस मिस्त्री यांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवेवरील अपघात वाढतच चालल्याचे चित्र आहे. मुंबई- पुणे महामार्गावर रविवारी रात्री दोन अपघात झाले. या दोन अपघातात तब्बल 12 जण जखमी झाले आहेत. जखमींवर नवी मुंबईच्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवेवरील रात्री खालापूरजवळ दोन अपघात झाले. एक खासगी बस ओल्या आणि निसरड्या रस्त्यावर स्लिप झाली आणि अपघात झाला. या अपघातामध्ये खासगी बसमधील 6 प्रवासी जखमी झाले. तर दुसरीकडे  त्याच रात्री आणखी एक अपघात घडला. फोर्ड इकोस्पोर्टस कारच टायर फुटलं होतं. या कारचे टायर बदलत असताना, चार प्रवासी हायवेवर उभे होते. नेमक्या याच वेळी गस्तीवर असलेली होमगार्डची जीप आली. या जीपमध्ये दोघे जण होते. दरम्यान, एका अज्ञात वाहनाने जीप आणि फोर्ड इकोस्पोर्ट्स या दोन्ही कारला जोरात धडक दिल्याने,  हा अपघात झाला आणि  या घटनेतही 6 जण जखमी झाले. रविवारी रात्री झालेल्या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील सर्व जखमींना नवी मुंबईच्या एमजीएम रुग्णालयात दाखलं करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

( हेही वाचा: Shivsena Dasara Melava: आता दसरा मेळाव्याचा वादही न्यायालयात जाणार ? )

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.