संजय राऊतांना मनी लाँड्रिंग अंतर्गत अटक, कोठडीतील मुक्काम वाढणार?

116

पत्रा चाळ पुर्नविकासाच्या प्रकल्पाच्या अंतर्गत शिवसेना नेते संजय राऊत यांना तब्बल १६ तास चौकशी केल्यानंतर रविवार, ३१ जुलै रोजी रात्री १२. वाजता अटक केली. त्यांना  मनी लाँड्रिंग कायद्याच्या अंतर्गत अटक करण्यात आली आहे, तसे पत्र ईडीने प्रसिद्ध केले आहे. याचा गुन्ह्याच्या अंतर्गत माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना अटक केली असून त्यांना जामीन मिळत नसल्याने त्यांचा मुक्काम वाढतच आहे. राऊत यांचाही या कायद्यामुळे मुक्काम वाढेल, अशी शक्यता आहे.

संजय राऊतांवर गंभीर आरोप 

याआधी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप झाला, पण त्यांना मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. तर लकी कम्पाऊंड प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनाही ईडीने अटक केली. त्यांच्यावर सुद्धा मनी लॉड्रिंगचा आरोप करण्यात आला आहे. मलिक आणि देशमुख हे सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. आता संजय राऊत यांना मनी लॉड्रिंग अॅक्ट २००२ [१५ of २००३] नुसार अटक केली आहे. ईडीच्या ताब्यात असलेले संजय राऊत यांना वैद्यकीय तपासणी करण्यासाठी जेजे रुग्णालयात घेऊन गेले आहे. रुग्णालयात तपासणी केल्यानंतर राऊत यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

(हेही वाचा राऊतांच्या अटकेचे पडसाद संसदेतही उमटले, दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.