संजय राऊत यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर भ्रष्टाचाराला पाठिबा देणार्यांनी आणि ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, अशांनी आपापली प्रक्रिया व्यक्त केली आहे. राऊतांना ज्याप्रकारे अटक झाली, आपलीही तीच दशा होऊ शकते ही भिती त्यांना सतावत आहे.
( हेही वाचा : सलीमच्या बाजूला जावेद गेला, आता शोले कोण लिहिणार?)
संजय राऊत यांनी पत्राचाळीतल्या लोकांना रस्त्यावर आणलेलं आहे, स्वप्ना पाटकर या महिलेला गलिच्छ शिवीगाळ केलेली आहे, तिला धमकी दिली आहे. राऊतांना ज्याप्रकारे समर्थन दिलं जात आहे, ते पाहू असं वाटतंय की जणू ते स्वातंत्र्यसैनिक आहेत आणि आता आपलं कर्तव्य बजावून इंग्रजांनी बजावलेली काळ्यापाण्याची शिक्षा भोगायला ते जात आहेत. राऊतांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत हे आपण विसरुन चालणार नाही.
राहुल गांधी देखील आता या वादात उतरले आहेत. त्यांनी संजय राऊतांच्या समर्थनार्थ एक ट्विट केलं आहे. त्यात ते लिहितात, “राजा का संदेश साफ़ है – जो मेरे खिलाफ़ बोलेगा, वो तकलीफें झेलेगा. सरकारी एजेंसियो का दुरुपयोग करके विरोधियों का हौसला तोड़ने और सच का मुंह बंद करने की पुरज़ोर कोशिश जारी है. लेकिन तानाशाह सुन ले, अंत में सत्य जीतेगा, और अहंकार हारेगा.” एवढं मोठं ट्विट संजय राऊतांचा फोटो अपलोड करुन केलेलं आहे.
राहुल गांधी यांनी मोदी-शाह यांना तानाशाह म्हटलेलं आहे. त्यांना त्यांच्या इतिहासाचा विसर पडलेला आहे. गांधी माय-लेकाने हुकूमशाही पद्धतीने सत्ता राबवली. सोनिया गांधींना विरोध झाला म्हणून आपल्या मर्जीतले, आपल्यासमोर डोळे वटारुन बोलू न शकणारे व आपल्या हुकुमत राहणारे मा. डॉ. मनमोहन सिंह यांना त्यांनी पंतप्रधान केलं. याच काँग्रेस हिंदूंना आतंकवादी ठरवलं. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा प्रचंड छळ केला.
आता सत्याचाच विजय होतोय
या सर्व प्रवासात मोदी-शाह यांनी कधीही व्हिक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला नाही. ते कारवाईला समोर गेले आणि त्यांची निर्दोष मुक्तता झाली. ज्या राऊतांची बाजू घेताना ते तानाशाही हा शब्द उच्चारत आहेत, त्या राऊतांनी अनेकांवर अन्याय केलेला आहे. त्यांनी महिलांना गलिच्छ भाषेत शिव्या दिलेल्या आहेत, किरीट सोमय्या यांना शिवी दिली, अडीच वर्षे या माणसाने नुसता हैदोस घातला होता. तेव्हा राहुल गांधींना तानाशाही आठवली नाही?
राहुल गांधी आता सत्याचा विजय होण्याची प्रतीक्षा करत आहेत. पण या वयोवृद्ध तरुणाला कुणीतरी सांगायला हवं की आता सत्याचाच विजय होतोय. कारण सरकारी एजेंसीचा दुरुपयोग गांधी आणि ठाकरे परिवाराने केला. अनेकांच्या मुसक्या आवळल्या, विरोधकांना नामोहरण केलं, पण त्यांच्या म्हणण्यानुसार जनतेने त्यांना जागा दाखवली. त्यांची सत्ता तर गेलीच, पण लाज वाटेल असा ठिकठिकाणी पराभव झाला. राजकीय कारकिर्दीत सपशेल पराभूत झालेल्या, पण नेहरुंचा वारसदार म्हणून टिकून राहिलेल्या राहुल गांधींना कोणीतरी सांगायला हवं की आता तुमचा अहंकार हरलेला आणि सत्याचा विजय होत चाललेला आहे.
Join Our WhatsApp Community