मल्लिकार्जुन खर्गे यांचीही ईडीकडून चौकशी, नॅशनल हेराल्ड प्रकरण भोवणार 

100

सध्या गांधी कुटुंबाला अडचणीत आणलेल्या नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेसचे अन्य नेतेही अडकत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. हे चौकशी नॅशनल हेराल्ड प्रकरणीच करण्यात आली आहे. खरगे यांच्यावर मनी लॉण्डरिंगचा आरोप करण्यात आला आहे.

आम्ही घाबरणार नाही – खर्गे 

खर्गे यांची ईडीकडून मागील साडेचार तासांपासून चौकशी सुरु आहे. खर्गे यांच्यावरही संसदेचे अधिवेशन सुरु असतानाच ईडीने समन्स बजावले. याप्रकरणी बोलताना खर्गे म्हणाले की, आपल्याला गुरुवारी, दुपारी साडेबारा वाजता बोलावण्यात आले. कायद्याचा सन्मान म्हणून आपण संसदेचे अधिवेशन सुरु असतांनाही आपल्याला चौकशीसाठी बोलावून घेणे योग्य नाही. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या निवासस्थानांचा पोलिसांनी घेराव करणे योग्य आहे का? आम्हाला घाबरवण्यासाठी हे केले जात आहे, आम्ही घाबरणार नाही, असेही खर्गे म्हणाले. दरम्यान, ईडीने बुधवारी, ३ ऑगस्ट रोजी दिल्लीतील हेराल्ड हाऊस येथील यंग इंडिया लिमिटेडचे कार्यालय सील केले. यंग इंडिया हे असोसिएटेड जर्नल्सचे मालक आहेत. मल्लिकार्जुन खर्गे हे कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी आहेत. या वर्षी एप्रिलमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नॅशनल हेराल्ड प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खर्गे यांची चौकशी केली होती. ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) त्यांचे म्हणणे नोंदवले होते.

(हेही वाचा अधिवेशनाची तयारी : मंत्रिमडळ विस्ताराआधीच संभाव्य मंत्र्यांकडून खात्यांचा अभ्यास सुरू)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.