पंजाब प्रांतात असलेल्या 1200 वर्षे पुरातन हिंदू मंदिराचा लवकरच जीर्णोद्धार होणार आहे. एका ख्रिस्ती कुटुंबाने या मंदिराचा अवैध ताबा घेतला होता. मात्र, अनेक वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर अखेर या कुटुंबाच्या ताब्यातून मंदिराची मुक्तता झाली असून, जनतेसाठी हे मंदिर खुले करण्यात आले आहे.
लाहोरमधील अनारकली बाजारात हे वाल्मीकी मंदिर आहे. दोन दशकांपूर्वी एका ख्रिस्ती कुटुंबाने या मंदिराचा ताबा घेतला आणि या मंदिरात सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश नाकारला. आम्ही हिंदू धर्म स्वीकरला असल्याचा दावा या कुटुंबाने केला आहे. त्यामुळे केवळ हिंदूमधील वाल्मीकी समजालाच या मंदिरात प्रवेश दिला जात होता. पाकिस्तानात अस्पसंख्यांकांच्या पुजास्थळांची देखरेख करणा-या निर्वासित मालमत्ता मंडळ विश्वस्त या संस्थेने या मंदिराचा ताबा घेण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याला यश आले असून, या मंदिराचा ताबा या संस्थेला देण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले.
( हेही वाचा: वनखाते कुणाकडे?; मुनगंटीवार आणि संजय राठोड यांच्यात रस्सीखेच )
लवकरच होणार जीर्णोद्धार
हे मंदिर बुधवारी भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. त्यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात शेकडो हिंदू आणि काही शीख, ख्रिस्ती समाजाचे नागरिक उपस्थित होते. या मंदिरात हिंदू भाविकांनी विधिवत पूजा केली आणि प्रथमच लंगरचे आयोजन केले. येत्या काही दिवसांत आराखड्यानुसार जीर्णोद्धार केला जाणार आहे, असे ईटीपीबी या संघटनेचे आमिर हाश्मी यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community