जम्मू-काश्मीर पोलीस उपनिरीक्षक भरती परीक्षा घोटाळ्यात सीबीआयने आज, शुक्रवारी राज्यात 30 ठिकाणी छापे टाकले. याप्रकरणी आतापर्यंत 33 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सीबीआयची अनेक पथके या प्रकरणाचा तपास करत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी नोंदी शोधल्या जात आहेत. मात्र, अद्याप या प्रकरणी सीबीआयने अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.
जम्मू-काश्मीर पोलीस उपनिरीक्षक भरती परीक्षा प्रकरणात सीबीआयने शुक्रवारी अखनूरमधील वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या. सीबीआयने अखनूरच्या लायब्ररीवरही छापा टाकून अनेक महत्त्वाची कागदपत्रे गोळा केल्याची माहिती मिळाली आहे. सीबीआयने आतापर्यंत टाकलेल्या छाप्यांवर कोणतेही वक्तव्य दिलेले नाही. राज्याच्या लेफ्टनंट गव्हर्नर यांनी 1200 पदांसाठी आयोजित जम्मू-काश्मीर पोलीस उपनिरीक्षक पदाची भरती परीक्षा यापूर्वीच रद्द केली आहे. त्यानंतरच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. अशा परिस्थितीत आता या 1200 पदांची नव्या पद्धतीने भरती होणार आहे.
(हेही वाचा – ईडीने गोठवले Wazir-X चे 64.67 कोटी रुपये!)
जम्मू-काश्मीर पोलीस उपनिरीक्षक भरती परीक्षा प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीने यासंदर्भातील अहवाल उपराज्यपालांना सादर केल्यानंतर सर्व भरती रद्द करण्याचे सांगितले होते. गृहसचिव आरके गोयल यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 6 जुलै रोजी उपराज्यपालांना अहवाल सादर केला होता. तर 10 जून रोजी लेफ्टनंट गव्हर्नरमध्ये जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या उपनिरीक्षकांच्या भरती परीक्षेतील हेराफेरीची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. तपास अहवालात त्यात मोठी फसवणूक झाल्याचे समोर आले. यापूर्वी देखील पेपर फुटल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचे समोर आले आहे.
Join Our WhatsApp Community