नुपूर शर्मांचे समर्थन केल्याने अमरावतीमध्ये उमेश कोल्हे यांची हत्या झाली, अहमदनगरच्या कर्जमध्येही एका तरूणाला धमकावून टोळक्याने कोल्हे हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केला असा आरोप नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. देशात शरिया कायदा लागू झालेला नाही, जर हिंदूंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केलात तर जशास तसं उत्तर देऊ अशा इशारा नितेश राणेंनी दिला आहे.
( हेही वाचा : माजी मंत्र्यांना अजूनही सरकारी बंगल्यांचा मोह सोडवेना; भुजबळ,आव्हाडांसह अनेक नेते सरकारी बंगल्यातच)
नितेश राणेंचा आरोप
अहमदनगरच्या कर्जतमध्ये एका तरूणाला धमकावून कोल्हे हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न झाला असा आरोप नितेश राणेंनी केला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला तरूण मृत्यूशी झुंज देत आहे, त्याची भेट घेऊन मदत करण्याचे आश्वासन राणेंनी दिलं आहे.
हिंदूंना तिसरा डोळा उघडावा लागेल, आमच्या लोकांना हात लावण्याचा प्रयत्न करू नका
आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार नाही तसेच अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक राहिलेले नाहीत, हिंदूंना टार्गेट केलंत तर जशास तसे उत्तर आम्हालाही देता येते असे नितेश राणे म्हणाले. आमच्या देवाची विटंबना केली तर आम्ही लोकशाही मार्गाने उत्तर देतो, एकालाही जीवे मारल्याचं ऐकलंय का? असा सवाल राणेंनी केला आहे. आपल्या लोकांच्या रक्षणासाठी हिंदूंना तिसरा डोळा उघडावा लागेल, आमच्या लोकांना हात लावण्याचा प्रयत्न करू नका असेही ते म्हणाले.
Join Our WhatsApp Community