मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना ‘फ्रेंडशिप डे’च्या शुभेच्छा देणार का? असा प्रश्न विचारला. तेव्हा सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी यावर उत्तर देणे टाळले, पण नंतर फ्रेंडशिप डे सगळ्यांसाठी असतो, माझ्या सगळ्यांना शुभेच्छा असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काय म्हणाले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीमध्ये आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीसाठी देशभरातल्या जवळपास सगळ्याच मुख्यमंत्र्यांनी सहभाग दर्शवला. पंतप्रधानांसोबतच्या या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना राज्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, थोडा वेळ द्याल का नाही? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारला. तसेच मंत्रिमंडळ विस्तार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा कोणताही संबंध नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले. भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात मिशन 48 सुरू केले आहे. हे मिशन भाजपा-शिवसेना युतीसाठी असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
(हेही वाचा जनप्रबोधनानंतर डिजिटल क्रांती झाली असती, तर सायबर गुन्हे घडलेच नसते! काय म्हणतायेत सायबर तज्ज्ञ? )
अजित पवार मित्रच
राज्यातल्या पूरस्थितीचे निवेदन देण्यासाठी अजित पवार मला भेटले होते. तेव्हा तुम्ही दोघे चांगले काम करत आहेत, निर्णयही पटापट घेत आहात, असे अजित पवार म्हणाले होते एकनाथ शिंदे यांनी केला. तसेच अजित पवार आमचे चांगले मित्र असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले
Join Our WhatsApp Community