पोपट वारंवार शिट्ट्या मारतो आणि त्याचा त्रास आम्हाला होतो. म्हणून पोपटाच्या मालकावर खडकी पोलीस स्थानकात विविध कलमाने गुन्हा दाखल केला आहे. अकबर अमजद खान असे गुन्हा दाखल झालेल्या पोपटाच्या मालकाचे नाव आहे.
पोपटाच्या शिट्यामुळे व्हायची झोप मोड
खान यांचा पोपट फिर्यादी सुरेश शिंदे यांना बघून शिट्या मारत होता. हे वारंवार होत असल्याने अखेर चिडलेल्या शिंदे यांनी खान यांना तुमचा पोपट माझी झोपमोड करतो, मला त्याच्या शिट्टीचा त्रास होतो. तुम्ही त्याला दुसरीकडे ठेवा, असे अनेकदा सांगितले होते. परंतु फिर्यादी यांना पोपट मालकाने सहकार्य न करता शिवीगाळ केल्याने त्यांच्यावर आता खडकी पोलीस स्टेशनमध्ये भादवि कलम 504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आता अशा प्रकरणात पोलीस नेमकी काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे आहे.
(हेही वाचा जनप्रबोधनानंतर डिजिटल क्रांती झाली असती, तर सायबर गुन्हे घडलेच नसते! काय म्हणतायेत सायबर तज्ज्ञ? )
Join Our WhatsApp Community