बॉलिवूडवर लोक का भडकले आहेत?

95

आमीर खानचा लाल सिंह चड्डा प्रदर्शित होणार आहे आणि भारतीय नागरिकांनी हा चित्रपट पाहू नका असं आवाहन केलं आहे. #BoycottLalSinghchaddha हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत आहे. याआधी बॉलिवूडचे काही चित्रपट अशाच प्रकारची मोहीम राबवून पाडण्यात आले होते. #BoycottBollywood हे हॅशटॅग देखील फिरतंय. आता आमीर खानने या चित्रपटाकडे पाठ फिरवू नका असं आवाहन केलं असल्याची बातमी झळकली होती.

सोशल मीडियामुळे पोलखोल

प्रश्न असा आहे की बॉलिवूडने असा कोणता गुन्हा केला आहे ज्यामुळे लोक त्यांच्यावर इतके भडकले आहेत. पूर्वी सोशल मीडिया नसल्यामुळे अनेकांचं खूप फावलं होतं. बर्‍याच गोष्टी गुलदस्त्यात राहिल्या होत्या. बॉलिवुड अंडरवर्ल्डशी जोडलेलं आहे याच्या बातम्या काधीतरी टिव्हीवर झळकायच्या. संजय दत्तपासून अनेकांचे डी कंपनीशी संबंध आहेत, हेही लपलं नव्हतं. तरी या सत्याची दाहकता लोकांना कळली नव्हती. जसजसा सोशल मीडिया मजबूत होऊ लागला, तसतसं अनेक जुन्या जाणत्या लोकांची पोलखोल होऊ लागली. मग मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून वावरणारा आमीर खान कसा सगळ्या चित्रपटात एकच एक्सप्रेशन देतो यापासून सुशांत सिंहची आत्महत्या नसून हत्याच आहे अशा अनेक गोष्टी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरल्या. बॉलिवुडचं ड्रग्ज कनेक्शन देखील लपून राहिलेलं नाही. आज देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कसा साजरा करायचा अशा आनंदाच्या विचारात असताना बॉलिवुड आज ’नागडं राहणं हा आमचा अधिकार आहे’ याच गोष्टीत रमलेलं आहे.

(हेही वाचा आमिर खानच्या Lal Singh Chaddha चित्रपटावर बंदीची मागणी! का सुरु आहे #BoycottLaalSinghChaddha ट्विटर ट्रेंड?)

बॉलिवूडच्या कलाकारांनी विचार करण्याची गरज

सलमान खानने फूटपाथवरील अनेक लोकांचा बळी घेतला, तरी तो निर्दोष सुटला. बॉलिवूडच्या कलाकारांनी केलेल्या आणि करत असलेल्या चुका आता लोकांना स्पष्ट दिसू लागल्या आहेत. स्वतःचे हात चिखलात माखलेले असताना हे लोक जनतेला ज्ञान वाटत फिरतात. कोणाला कशाकशात अंधश्रद्धा दिसते, तर कोणाला हिंदू अतिरेकी वाटतात. चित्रपटात हिंदू संस्कृती विकृत करुन दाखवतात. प्रपोगंडा चित्रपट तयार करतात. लोकशाहीने त्यांना व्यक्त होण्याचा अधिकार जरुर दिला आहे. पण मग बॉलिवूडच्या आतमध्ये जे गलिच्छ चाळे होतात, त्याविरोधात हे लोक का बोलत नसावेत? तेव्हा ह्यांचा समजुतदारपणा कुठे जातो? त्यामुळे आता जनतेनेही आपला लोकशाहीचा अधिकार वापरण्याची शपथ घेतली आहे. म्हणूनच लोक बॉलिवूडचे चित्रपट पाहू नका असं आवाहन करत आहेत. बॉलिवूडच्या कलाकारांनी या गोष्टीचा विचार करण्याची नितांत गरज आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.