जालन्यात स्टिल कारखानदारांच्या घरात सापडले 390 कोटींचे घबाड, 32 किलो सोनं!

113

राज्यात सर्वाधिक लोखंजी गज उत्पादित करणाऱ्या जालन्यातील स्टील कारखानदारांच्या कारखान्यांवर, घर, कार्यालयांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. या छापेमारीमध्ये आयकर विभागाच्या हाती मोठे घबाड लागले आहे. या कारवाईत आयकर विभागाच्या हाती तब्बल ३९० कोटींची बेहिशेबी मालमत्ता समोर आली आहे. यामध्ये ५८ कोटींची रोख रक्कम, ३२ किलो सोन्याचे दागिने, हिऱ्यांसह १६ कोटींचा ऐवज सापडला आहे. इतकंच नाही तर ३९० कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रही सापडली आहे.

(हेही वाचा – FASTag महागणार? काय आहे कारण?)

ज्यांच्यावर कारवाई झाली यामध्ये औरंगाबादमधील एका प्रख्यात लँड डेव्हलपर आणि व्यापाऱ्याचाही समावेश आहे. विशेष म्हणजे स्टिल कारखानदारांच्या घरात सापडलेले ५८ कोटी रूपये मोजण्यासाठी तब्बल १३ तास लागल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, १ ते ८ ऑगस्टपर्यंत चाललेल्या या कारवाईसाठी नाशिक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्यभरातील २६० अधिकाऱ्यांसह कर्मचारी १२० हून अधिक वाहनांच्या ताफ्याद्वारे जालन्यात दाखल झाले होते. जालन्यात मिळालेली ही रोकड स्थानिक स्टेट बँकेत नेऊन मोजण्यात आली असून सकाळी ११ वाजता सुरू झालेली मोजणी रात्री १ वाजता पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे.

आयकर विभागाच्या औरंगाबादच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, जालना येथील चार बड्या स्टील कारखानदारांनी कोट्यावधी रुपयांचे जादा उत्पन्न व्यवसायातून मिळवत ते पूर्णपणे रेकॉर्डवर न आणता रोखीत व्यवहार केले आहेत. याचा प्राप्तिकर न भरल्याचा त्याच्यांवर संशय होता. नाशिकच्या पथकाने स्थानिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने जालन्यात १ ऑगस्टला दुपारच्या सुमारास वेगवेगळ्या वाहनातून जाऊन स्टील कारखानदार आणि व्यावसायिकांच्या कार्यालयांवर तसेच निवासस्थानी धाड टाकली. एकाच वेळी ५ पथकांनी ही कारवाई केल्याचे समोर येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.