पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेस व्हिस्टाडोम कोचसह धावणार!

119

पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसला आता नवा व्हिस्टाडोम डबा जोडण्यात आला आहे. या आधुनिक डब्यातून प्रवास करताना गाडीत बसूनच बाहेरील निसर्गरम्य दृष्ये पाहत पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. हेच या डब्याचे वैशिष्ट्य आहे. या डब्यात बसून सोलापुरातील प्रवाशांनी प्रवास केला अन नव्या सेवेचा आनंद घेतला.

( हेही वाचा : मुंबई ते चेन्नई प्रवास होणार सुसाट…)

काचेचे आवरण, रुंद खिडक्या व दरवाज्यामुळे व्हिस्टाडोम डबे भारतीय रेल्वेत लोकप्रिय ठरत आहेत. आता मध्य रेल्वेचा पाचवा व्हिस्टाडोम डबा शताब्दी एक्स्प्रेसमध्ये जोडला आहे. या नव्या डब्यामुळे शताब्दीच्या प्रवाशांना भिगवणजवळील उजनी धरण आणि बॅकवॉटरमधील नयनरम्य दृष्याचा आनंद येईल. तसेच विकाराबादजवळील अनंतगिरी टेकड्यांमधून रेल्वे धावताना जंगलातील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेतील. शताब्दी एक्स्प्रेस (१२०२५) पुण्याहून सकाळी ६ वाजता (मंगळवार वगळता) सुटेल. सोलापूरला सकाळी ९ वाजता येईल. त्याच दिवशी दुपारी २:२० वाजता सिकंदराबाद येथे पोहोचेल. पुन्हा शताब्दी एक्स्प्रेस (१२५२६) सिकंदराबाद येथून दुपारी २:४५ वाजता सुटेल. सोलापूरला रात्री ८ वाजता, त्याच दिवशी रात्री ११:१० वाजता पुण्याला पोहोचेल.

असे आहे नव्या डब्याची वैशिष्ट्ये

व्हिस्टाडोम डब्यामुळे निसर्गरम्य दृष्य पाहण्याची संधी प्रवाशांना मिळणार आहे. रुंद खिडकी, एलईडी दिवे, ३६० फिरता येण्याजोग्या सीट्स आणि पुशबॅक खुर्च्या, रुंद बाजूचे सरकते दरवाजे आदी वैशिष्ट्ये आहेत. पारदर्शी व्ह्यूइंग गॅलरी असल्याने प्रवाशांना बाहेरील दृश्यांचा आनंद घेता येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.