राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा राज्यपालांनी आपल्या निवृत्तीवरुन एक विधान केले आहे. मी सध्या राज्याच्या राज्यपाल पदावर काम करत आहे. पण मला निवृत्त व्हायचं आहे. मोदींनी मला राज्यपाल का बनवलं आहे?, असे विधान राज्यपाल कोश्यारी यांनी केले आहे. अहमदनगर येथील स्नेहालय संस्थेत युवा प्रेरणा शिबीराच्या उद्घाटन सोहळ्यात राज्यपाल बोलत होते.
मला निवृत्त व्हायचं आहे पण…
मी राज्याचा राज्यपाल आहे, मला निवृत्त व्हायचं आहे. पण मला केंद्र सरकारकडून निवृत्ती देण्यात येत नाही. स्नेहालय संस्थेच्या गिरीश कुलकर्णी यांना पाहिल्यावर वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदींना मला राज्यपाल का केलं आहे?, गिरीश कुलर्णींसारख्या लोकांना हे पद द्यायला हवं, ज्यांनी भरीव असं कार्य केलं आहे, असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी केलं आहे.
(हेही वाचाः ‘…तर बावनकुळेंचा मुख्यमंत्रीपदासाठी विचार होऊ शकतो’, फडणवीसांसमोर गडकरींचे मोठे विधान)
देशाच्या प्रगतीबाबत समाधान
तसेच यावेळी राज्यपालांनी यावेळी स्वातंत्र्यानंतर गेल्या 75 वर्षांत देशात झालेल्या प्रगतीबाबतही समाधान व्यक्त केले आहे. आपला भारत आता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. गेल्या 75 वर्षांत भारताने उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे. जी घरे वीजेसारख्या सेवेपासून वंचित होती त्यांना आता वीज मिळाली आहे. तसेच गेल्या 7 ते 8 वर्षांत देशातील 33 कोटी जनतेचे बँकेत खाते सुरू झाले आहे. अशा अनेक गोष्टींमुळे समाधान वाटत असल्याचे कोश्यारी म्हणाले.
Join Our WhatsApp Community