जास्त भाडे घेणे किंवा जवळच्या ठिकाणी जाण्यास नकार देणे यावरून प्रवासी आणि टॅक्सी चालकांमध्ये नेहमी वादाचे प्रसंग निर्माण होतात. अशा परिस्थितीत तुम्हाला साध्या किंवा App आधारित टॅक्सी चालकांविरोधात तक्रार करायची असल्यास तुम्ही ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयाने(RTO) जारी केलेल्या ९०७६२०१०१० या क्रमांकावर तक्रार करू शकता.
( हेही वाचा : One Nation One Exam : देशभरात द्यावी लागेल एकच परीक्षा, नीट-जेईई होणार नाही?)
याठिकाणी करा तक्रार दाखल
- तक्रारीनंतर चालक दोषी आढळल्यास संबंधित चालकावर कारवाई करण्यात येईल. प्रवाशांच्या मदतीसाठी आरटीओने विशेष पथक नेमले आगे. या पथकाला संपर्क साधण्यासाठी सुद्धा तुम्ही ९०७६२०१०१० या क्रमाकांचा वापर करू शकता.
- तसेच प्रवासी [email protected] या ई-मेलवर तुम्ही पुराव्यासकट तक्रार दाखल करू शकतात. दोषी आढळल्यास परवाना रद्द किंवा निलंबन, दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. याची अंमलबजावणी १ सप्टेंबर २०२२ पासून करण्यात येणार आहे.
जीवनदूत सत्कार योजना
रस्ते अपघातच्या प्रसंगी टॅक्सीचालकांनी संबंधिताच्या मदतीसाठी जाणे गरजेचे आहे. टॅक्सीचालकांनी मदतीसाठी स्वत:हून पुढे येणे गरजेचे आहेच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी RTO ने जीवनदूत सत्कार योजना सुरू केली आहे. याद्वारे मदत करणाऱ्या टॅक्सीचालकांचा सत्कार करण्यात येईल.
Join Our WhatsApp Community