ठाकरे सरकारची दीड वर्षे महाराष्ट्रासाठी त्रासदायक गेली. कोणत्याही प्रकारची विशेष नवी विकासात्मक कामे या कार्यकाळात झाली नाहीत. चांगली गुंतवणूक देखील महाराष्ट्रात आली नाहीत. पण १०० कोटींची वसुली मात्र योग्यरित्या सुरु होती. या घाणेरड्या कृत्यांवर ज्यांनी टीका केली त्यांना दडपशाहीने आणि कायद्याचा गैरवापर करुन गप्प बसवण्याचा प्रयत्न झाला.
अनंत करमुसेला पोलिसांच्या माध्यमातून मारहाण
माझं स्पष्ट मत आहे की समाज माध्यमांवर एखाद्या मोठ्या व्यक्तीबद्दल भाष्य करताना शक्यतो शिव्यांचा वापर करु नये. शिव्या दिल्यामुळे मूळ मुद्दा बाजूला राहतो आणि केवळ शिव्याच तेवढ्या दिसतात. त्यामुळे ज्यांनी अश्लील टीका केली त्यांच्यावर कारवाई झाल्यास समजून घेता येईल. परंतु हाच एक उद्योग पोलीसांकडे उरला आहे का? असा प्रश्न विचारावासा वाटतो. अनंत करमुसेला पोलीसांच्या माध्यमातून मारहाण करण्यात आली. पोलीस काय या नेत्यांचे गुलाम आहेत का?
अर्णब गोस्वामी यांना अटक केली
अर्णब गोस्वामी यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली म्हणून त्यांना अटक करण्यात आली, एखाद्या आतंकवाद्याला ज्याप्रकारे वागवलं जातं, तसं वागवलं गेलं. मागच्या सरकारने अक्षरशः हैदोस घातला होता. लोकशाहीचा प्रचंड अपमान या काळात झाला. त्या काळी अनेक भाजपा समर्थकांवर तांगती तलवार होती. एकतर सरकारचे गुंड येऊन मारहाण करतात, नाहीतर तुरुंगवास होतो. यामुळे जनता भडकली होती.
(हेही वाचा मेटेंचे अपघाती निधन; महामार्ग पोलिसांची ‘गोल्डन अवर्स’ संकल्पना कागदावर?)
कायद्याचा धाक दाखवावाच लागतो
आम्ही आमचं मत देखील व्यक्त करु नये का? असा रास्त सवाल जनता विचारात होती. पण मग्रूर सत्तेला हा सवाल ऐकू येत नव्हता. आता शिंदे सरकार आल्यामुळे या समर्थकांना दिलासा मिळाला आहे. महत्वाचे म्हणजे आता विरोधकांना चांगलाच धडा शिकवला जात आहे. शेफाली वैद्य आणि नरेंद्र मोदींवर अश्लील टीका करणार्याला तुरुंगाचा रस्ता दाखवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे प्रमुख आहेत. त्यांच्यावर टीका करायची असल्यास सभ्य भाषेत आणि मुद्देसूद टीका करायला कोणाची हरकत नाही. त्याचप्रकारे शेफाली वैद्य ह्या स्त्री आहेत. आपण स्त्रियांबद्दल असे विचार प्रकट करत नाही. पण केवळ पक्षाच्या प्रेमात पडलेल्या प्रेमवीरांना हे कळत नाही. म्हणून त्यांना कायद्याचा धाक दाखवावाच लागतो.
भाजपा समर्थक जागृत झाले
अमृता फडणवीस यांच्या गलिच्छ टीका करणार्याच्या विरोधात देखील तक्रार दाखल झाली आहे. दीड वर्षे विनाकारण भाजपा समर्थकांना त्रास देण्यात आला. आता भाजपा समर्थक जागृत झाले आहेत. अयोग्य पद्धतीने पोलीस तक्रार करत नसले तरी अश्लील टीका करणार्यांना आता त्यांनी कायद्याचा धाक दाखवायला सुरुवात केली आहे. “आली रे आली आता तुझी बारी आली” हा सिंघम चित्रपटातील डायलॉग खूप गाजला होता. विरोधकांना या डायलॉगची आठवण झाली असावी.
Join Our WhatsApp Community