लवकरच भारतात तयार होणार ओमायक्रॉनवर खास लस

89

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट सध्या नोवाव्हॅक्ससोबत ओमायक्रॉन व्हेरियंटवर लस विकसित करण्यासाठी काम करत आहे. त्यानुसार लवकरच ओमायक्रॉनवर लस तयार होणार आहे, अशी माहिती अदर पुनावाला यांनी दिली आहे. या वर्षाच्या शेवटी हे लस तयार होईल, ही लस ओमायक्रॉनच्या BA 5 च्या व्हेरियंटवर अधिक उपयुक्त असणार आहे.

बूस्टर डोसप्रमाणेही घेता येईल लस   

जगभरात सध्या ओमायक्रॉनच्या BA व्हेरियंटच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. चीनमध्येही या विषाणूच्या रुग्णसंख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. भारतातही रुग्ण सापडत आहेत. अशा वेळी नव्याने विकसित होणारी ही लस बूस्टर लसीच्या रुपात घेतल्यास ती प्रभावी ठरेल, असे पुनावाला म्हणाले. ओमायक्रॉन आजाराची अनेक लक्षणे तिसर्‍या लाटेत दिसली. ताप, खोकला, घसा खवखवणे, नाक वाहणे, भूक न लागणे, स्नायू कमकुवतपणा, कफ आणि थकवा यासारखी लक्षणे जाणवत होती.

(हेही वाचा मुलुंडमध्ये घराचा स्लॅब कोसळून २ जण ठार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.