आपण अहिंसेचे उपासक, दुर्बलतेचे नव्हे; सरसंघचालकांच्या विधानात दडलं आहे सत्य

107

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ’उत्तर भारत’ या कार्यक्रमात केलेले विधान अतिशय महत्वाचे आहे. या कार्यक्रमात त्यांनी २०४७ सालचा भारत कसा असेल यायाबद्दल संबोधन केले. ’संपूर्ण जग विविधतेचे व्यवस्थापन करण्यासाठी भारताकडे पाहत आहे.’ आपण विविधता मे एकता असं म्हणतो तेव्हा बर्‍याचदा हिंदु-मुस्लिम-ख्रिस्ती अशी उदाहरणे देतो. परंतु प्राचीन काळापासून आपल्या या विशात देशात विविधता मे एकता नांदत आहे. अनेक प्रांत, अनेक जाती इथे अस्तित्वात असताना देखील आपण एक होतो. ही आहे विविधता मे एकतेची खरी व्याख्या. बाहेरुन आलेल्या इतर धर्मावर आपण प्रेम केलं.

तर या कार्यक्रमातले माझ्या दृष्टीकोनातून सर्वात महत्वाचे विधान म्हणजे, “आपण अहिंसेचे उपासक नक्कीच आहोत, पण दुर्बलतेचे नव्हे.” स्वा. सावरकरांना देखील गौतम बुद्धांचे खूप आकर्षण होते. गौतम बुद्धांनी त्या अहिंसेचा संदेश देऊन भारतावर खूप मोठे उपकार केले आहेत, अशी सावरकरांची धारणा होती. परंतु दुर्बल माणसाच्या अहिंसेला महत्व नसते. सावरकरांनी आपल्या जीवनात शस्त्राचा पुरस्कार केलेला आहे. याचा अर्थ ते हिंसक होते, असा होत नाही. १९२० नंतर भारताला पराकोटीच्या अहिंसेने पछाडले होते.

शस्त्र हातात घेणं हे पाप मानलं जात होतं. आपण दुर्बळ झालो होतो. गौतम बुद्धांनी सांगितलेली अहिंसा आपण विसरलो होतो. आपण दुर्बळ झाल्यामुळे अहिंसक झालो होतो. पण काळी सुद्धा चंद्रशेखर आझाद, भगतसिंह आणि क्रांतिकारकांचे मुकुटमणी स्वा. सावरकर यांनी किल्ला लढवला नसता तर हिंदुस्थानाला कित्येक फाळणीला सामोरे जावे लागले असते. पण सुदैवाने अनेक क्रांतिकारकांना मूळ प्रश्न कळला आणि त्याकाळी भारताची एकच फाळणी झाली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांना जी दुर्बलता सांगायची आहे ती ही आहे. आपल्या तत्कालीन नेत्यांच्या दुर्बलतेमुळे आणि भारतीय समाजाला अहिंसेचे अतिरिक्त डोस पाजल्याने भारतीय समाज दुर्बळ झाला आणि त्याला भयावह अशा फाळणीला सामोरं जावं लागलं. सैनिकी तापद वापरुन दंगली रोखता येऊ शकल्या असत्या तरी ब्रिटिशांना हिंदुंची वाताहत पाहायची होती. कारण एकट्या हिंदु समाजाने भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांशी दोन हात केलेले आहेत. ही दुर्बलता आता नष्ट झालेली आहे.

जगातल्या सर्वात मोठ्या सामाजिक संघटनेचे प्रमुख जेव्हा बोलतात की, आम्ही अहिंसेचे उपासक आहोत, पण दुर्बलतेचे नाही, त्यावेळी हा एक संदेश असतो. हा संदेश हिंदी जातीपर्यंत पोहोचलेला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.