मुंबईतील वाहतुकीच्या रेल्वे पूल व उड्डाणपूलांची कामे हाती घेण्यात आली असून या पुलांची रंगरंगोटीवर आता भर दिला जात आहे. केवळ पुलांची रंगरंगोटी नव्हेतर पुलांच्या खालील भागांमधील भिंतीवर चित्रेही रेखाटत त्यांच्या सौदर्यात भर पाडण्यासाठी शहरातील ३३ पुलांची कामे हाती घेण्यात आल्यानंतर आता उपनगरातील ११ पुलांची सौदर्यात्मक रंगरंगोटी आणि भिंती चित्रांचे काम हाती घेण्यात येत आहे. या ११ पुलांच्या सौदर्यात्मक रंगरंगोटीसाठी तब्बल ८.८१ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. म्हणजेच एका पुलासाठी सुमारे ८० लाखांचा केला.
मुंबईतील महापालिकेच्या ताब्यात असलेल्या सर्व विद्यमान पूलांना सौदर्यात्मक रंगरंगोटी आणि भित्ती चित्रांचे काम करून महापालिकेच्या आणि पर्यायाने मुंबईच्या सौदर्यात भर घालण्याचा निर्णय घेण्यात आले. अतिरिक्त आयुक्त प्रकल्प पी वेलरासू यांच्या दालनात झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात शहरातील ३३ विद्यमान पूलांना सौदर्यात्मक रंगरंगोटी आणि भित्ती चित्रांचे काम यापूर्वीच बहाल केले आहे. ३३ पूलांच्या रंगरंगोटीसाठी साडेसहा कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे.
( हेही वाचा : ‘वंदे मातरम’ची काँग्रेसलाही ऍलर्जी! धर्मांध रझा अकादमीच्या पावलावर पाऊल )
पूलाच्या रंगरंगोटीवर ८०लाखांचा खर्च
त्यानंतर, आता पूर्व उपनगरातील ११ पूलांच्या रंगरंगोटीच्या कामासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. त्यासाठी ८ कोटी ८१ लाख रुपये खर्च करण्यात येणार असून यासाठी कुवाला कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कामांमध्ये प्रत्येक पूलाच्या भिंती आकर्षक रंगांनी रंगवल्या जाणार आहेत, आणि त्या पूलावरील भिंतीच्या दर्शनी भागांवर भित्तीचित्रे रेखाटली जातील. ज्यामुळे या पूलांच्या भिंतीही बोलक्या होऊन आसपासच्या परिसराच्या सुशोभिकरणातही भर पडेल. यामुळे पूलाचे सौदर्यही वाढेल,असा विश्वास पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे प्रत्येक पूलाच्या रंगरंगोटीसाठी सुमारे ८० लाखांचा खर्च करण्यात येत असून एवढी लाखांची रंगरंगोटी एका पूलावर केली जाणार असल्याने सर्वांनाच प्रश्न पडला आहे. यापूर्वी ज्या ३३ पूलांच्या रंगरंगोटीचे काम हाती घेण्यात आले होते, त्यातील एका पूलासाठी सुमारे २०लाख रुपयांचा खर्च येणार होता, परंतु उपनगरातील पुलांसाठी प्रत्येकी ८० लाखांचा खर्च येणार आहे.
Join Our WhatsApp Community