MPSC आणि B.Ed CET परीक्षा एकाच दिवशी; विद्यार्थ्यांना सरकारकडून ‘हा’ पर्याय

91

एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा एकाच दिवशी आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकच संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान संभ्रमात असलेल्यांना विद्यार्थ्यांना सरकारने पर्याय दिला आहे. दोन्ही परीक्षा देणाऱ्यांना तारखेबाबत पर्याय देण्यात येणार असल्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. २१ ऑगस्ट रोजी एकाच तारखेला एमपीएससी आणि बीएड परीक्षा आल्याने विद्यार्थी नाराज झाले. मात्र दोन्ही परीक्षा एकत्र देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समोर मोठी अडचण निर्माण झाल्याने त्यावर सरकारने तोडगा काढला आहे.

(हेही वाचा – हत्या की आत्महत्या? जम्मूच्या सिदरा परिसरात एकाच कुटुंबातील 6 जणांचा संशयास्पद मृत्यू)

सरकार कडून पर्याय देण्यात येणार

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा आणि बीए़ड सीईटी परीक्षा २१ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांचा मोठा गोंधळ उडाला होता. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा २१ ऑगस्टला आहे. तर बीएड सीईटी परीक्षा २१ ऑगस्टपासून ३ दिवस आहे. यामुळे या दोन्ही परीक्षा एकाच तारखेला आल्या आहेत. एका परीक्षेला मुकावं लागणार की काय, अशी भावना आणि संभ्रम विद्यार्थ्यांच्या मनात होता. पण सरकारने यावर तोडगा काढला आहे. दोन्ही परीक्षा देणाऱ्यांना तारखेबाबत पर्याय देणार असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

काय असणार पर्याय

एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा एकाच दिवशी (२१ ऑगस्ट २०२२) होणार असून, या दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी बॅच बदलण्याचा पर्याय देणार येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवेदनाद्ववारे विधानपरिषदेत व विधानसभेत केले. सीईटी कक्षामार्फत बीएड व बीएचमसीटी या दोन विषयाची परीक्षा २१ ऑगस्ट रोजी होणार असून, जे उमेदवार या परीक्षांबरोबरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेस बसलेले असतील त्यांनी याबाबत त्वरीत सीईटी कक्षास ई-मेलद्वारे कळवावे, जेणेकरून त्यांना सीईटी मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी बॅच बदलून देण्याची कार्यवाही करता येईल. या उमेदवारांनी [email protected] या ई-मेलवर तात्काळ पत्रव्यवहार करावा, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.