गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे ईडीच्या ताब्यात आहेत. तर दुसरीकडे ईडीच्या कार्यालयाकडून मुंबईत आणखी काही ठिकाणी छापेमारीला सुरूवात केली आहे. या नव्या सर्च ऑपरेशनमुळे संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर ईडीने मुंबईतील दोन ठिकाणी सर्च ऑपरेशन केले होते. त्यानंतर ईडीची बुधवार सकाळपासून पुन्हा छापेमारी सुरू आहे.
( हेही वाचा : मोदी सरकारचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना ३ लाखापर्यंतच्या कर्जामध्ये १.५ टक्के सूट )
ईडीची छापेमारी सुरू
पत्राचाळ पुनर्विकासातील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांना १६ तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली होती. त्यांच्या भांडूप येथील मैत्री बंगल्यावर ईडीने मारलेल्या छाप्यामध्ये ११.५ लाख रुपयांची रोकड सुद्धा जप्त करण्यात आली होती. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी चौकशीअंती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. राऊत आता न्यायालयीन कोठडीत आहेत, असे असतानाच ईडीकडून आणखी काही ठिकाणी छापेमारी सुरू करण्यात आल्याने राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community