रोहिंग्यांना राहण्यासाठी सरकारकडून फ्लॅट मिळणार? केंद्रीय गृहमंत्रालयाने केलं मोठं विधान

160

दिल्लीमध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या रोहिंग्यांना राहण्यासाठी सरकारकडून फ्लॅट दिले जाणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यावर केंद्रीय गृहमंत्रालयाने मोठं विधान केले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने यावर स्पष्टीकरण देताना असे म्हटले की, रोहिंगे जिथे राहत आहेत, तिथेच राहणार असून त्यांना डिटेंशन सेंटर्समध्येच राहावं लागणार आहे. त्यांना राहण्यासाठी फ्लॅट देण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.

(हेही वाचा – भाजपच्या नव्या संसदीय मंडळाची घोषणा! शिवराज चौहानांसह गडकरींना वगळले, ‘या’ नेत्यांना एन्ट्री)

दरम्यान, नवी दिल्लीच्या बक्करवाला येथे मोठ्या प्रमाणावर रोहिंगे बेकायदेशीरपणे राहत आहेत. त्यांना ईडब्ल्यूएस फ्लॅट उपलब्ध करून देण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. दिल्ली सरकारने रोहिंग्यांना नव्या ठिकाणी स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला होता, या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने हा मोठा निर्णय घेतला आहे. तर या रोहिंग्यांना त्यांच्या देशात पाठवण्याकरता हालचाली सुरू झाल्या आहेत.

दिल्ली सरकारने रोहिंग्यांना नवीन ठिकाणी स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव दिला आहे. गृहमंत्रालयाने म्हटले की, राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली सरकार (GNCTD) ला रोहिंग्या बेकायदेशीर परदेशी सध्याच्या ठिकाणी राहतील याची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, कारण गृहमंत्रालयाने आधीच परराष्ट्र मंत्रालयामार्फत संबंधित देशाकडे त्यांच्या हद्दपारीचा मुद्दा उपस्थित केला आहे. तत्पूर्वी, केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की, सर्व रोहिंग्या निर्वासितांना दिल्लीतील बक्करवाला भागातील ईडब्ल्यूएस फ्लॅटमध्ये हलवले जाईल. देशात आश्रय मागणाऱ्यांचे भारताने नेहमीच स्वागत केले आहे. ऐतिहासिक निर्णयानुसार, सर्व रोहिंग्या निर्वासितांना दिल्लीच्या बकरवाला भागातील ईडब्ल्यूएस फ्लॅटमध्ये हलवले जाईल. त्यांना मुलभूत सुविधा, यूएनएचसीआर आयडी आणि 24 तास पुरवले जातील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.