गणेश विसर्जनासाठी पुण्यातील घनकचरा विभागातर्फे यावर्षीसुद्धा १५० फिरते हौद उपलब्ध करून देण्यात आले असून, संपूर्ण शहरात १३६ स्थिर विसर्जन हौद उपलब्ध करणार असल्याची माहिती पुणे महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
( हेही वाचा : गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी मुंबईत ईडीची छापेमारी सुरु )
विसर्जन तलावांच्या बांधकामाचे नियोजन
कोरोनानंतर दोन वर्षांनी पुण्यातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होणार असून, पुणे महापालिकेनेही गणेशोत्सवाच्या नियोजनाला सुरुवात केली आहे. दरवर्षीप्रमाणे महापालिकाकडून विसर्जन घाट, स्थिर हौदांची आणि पुणे शहरात फिरत्या विसर्जन हौदांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच पालिका हद्दीत नव्याने समावेश झालेल्या २३ फिरत्या हौदांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गणेशोत्सव काळात दीड दिवस, पाच, सात आणि दहा दिवसांचे गणेश विसर्जन केले जाते. त्यानुसार महापालिकेने विसर्जन तलावांच्या बांधकामाचे नियोजन केले आहे.
पुणे महापालिकेचे नियोजन
घनकचरा विभागाकडून १५० फिरत्या हौदांची व्यवस्था करण्यात येत असून, महापालिकेच्या पंधरा क्षेत्रीय कार्यालयातून स्वतंत्रपणे फिरत्या हौदांची व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय शहरातही ठिकठिकाणी विसर्जन तलाव बांधण्यात येणार आहेत. यंदा शहरातील विविध भागात १३६ ठिकाणी स्थिर विसर्जन तलाव बांधण्यात येणार आहेत. निश्चित केलेल्या टाक्यांची स्वच्छता, रंगरंगोटी, दिवाबत्ती या सगळ्यांसाठी खर्चास मान्यता दिल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community