नागपुरात शिवसेनेला आणखी एक धक्का, सहसंपर्कप्रमुख मंगेश काशीकर यांचा राजीनामा

90

शिवसेनेमध्ये सुरु असलेली गळती अजूनही सुरुच आहे. आता नागपुरात शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. शिवसेनेचे नागपूर सहसंपर्कप्रमुख मंगेश काशीकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मंगेश काशीकर हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. मंगेश काशीकर यांनी शिंदे गटाचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय किरण पांडव यांची भेट घेतल्यानंतर, आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्यानंतर, ते शिंदे गटात सामिल होतील, अशा जोरदार चर्चा सध्या सुरु आहेत.

शिंदे गटात होणार सामिल 

मंगेश काशीकर आधी एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय किरण पांडव यांच्या भेटीला गेले आणि या भेटीनंतर काशीकर यांनी शिवसेनेच्या नागपूर सहसंपर्कप्रमुख पदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर, मंगेश काशीकर हे शिंदे गटात सामील होणार असल्याची माहिती समोर येत आहे. ते किरण पांडव यांच्यामार्फत शिंदे गटात सहभागी होणार आहेत. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

( हेही वाचा: आधी राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी; मगच सभापती पदाची लढाई )

आदित्य ठाकरे पुन्हा शिवसेनेत प्राण फुंकण्याच्या प्रयत्नात

दरम्यान, दुसरीकडे शिवसेना लवकरच कमबॅक करेल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. आदित्य ठाकरे मैदानात उतरले असून, त्यांनी सभांचा धडका लावला आहे. यामाध्यमातून शिवसेनेचे जोरदार शक्तिप्रदर्शन सुरु आहे. मात्र तरीदेखील गळती सुरुच असल्यामुळे शिवसेनेच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.