रेल्वेच्या भुसावळ – देवळाली, भुसावळ – वर्धा, पुणे – सोलापूर, मिरज – हुबळी, मिरज – कॅसल रॉक आणि मिरज – लोंडा दरम्यान धावणाऱ्या अनारक्षित गाड्या खाली दिलेल्या तपशिलानुसार पूर्ववत करण्यात येणार आहेत.
( हेही वाचा : मुंबईकरांना ‘बेस्ट’ गिफ्ट! देशातील पहिल्या एसी Double Decker बसचे लोकार्पण )
१) भुसावळ – देवळाली – भुसावळ
- ट्रेन क्र.11114 दि. १६ सप्टेंबर २०२२ पासून भुसावळ येथून दररोज १७.३० वाजता सुटेल आणि देवळाली येथे त्याच दिवशी २२.४५ वाजता पोहोचेल.
- ट्रेन क्र.11113 दि. १७ सप्टेंबर२०२२ पासून देवळाली येथून दररोज ०७.२० वाजता सुटेल आणि भुसावळ येथे त्याच दिवशी १२.१५ वाजता पोहोचेल.
२) भुसावळ – वर्धा – भुसावळ
- गाडी क्रमांक 11121 दि. १५ सप्टेंबर २०२२ पासून भुसावळ येथून दररोज १४.३० वाजता सुटेल आणि वर्धा येथे त्याच दिवशी २१.०० वाजता पोहोचेल.
- गाडी क्रमांक 11122 दि. १६ सप्टेंबर २०२२ पासून दररोज वर्धा येथून ००.०५ वाजता सुटेल आणि भुसावळ येथे त्याच दिवशी ०७.२५ वाजता पोहोचेल.
३) पुणे – सोलापूर – पुणे
- ट्रेन क्र.11417 दि. १५ सप्टेंबर २०२२ पासून दररोज पुणे येथून २३.०० वाजता सुटेल आणि सोलापूर येथे दुसऱ्या दिवशी ०७.५५ वाजता पोहोचेल.
- गाडी क्रमांक 11418 दि. १५ सप्टेंबर २०२२ पासून सोलापूर येथून दररोज ११.४० वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी १९.२५ वाजता पोहोचेल.
४) मिरज – हुबळी – मिरज
- ट्रेन क्रमांक 17332 दि. २५ ऑगस्ट २०२२ पासून दररोज १०.३० वाजता हुबळी येथून सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी १८.३० वाजता पोहोचेल.
- ट्रेन क्रमांक 17731 दि. २७ ऑगस्ट २०२२ पासून मिरज येथून दररोज ०६.१० वाजता सुटेल आणि हुबळी येथे त्याच दिवशी १५.०० वाजता पोहोचेल.
५) मिरज – कॅसल रॉक – मिरज
- ट्रेन क्रमांक 17333 दि. २६ ऑगस्ट २०२२ पासून मिरज येथून दररोज १०.३० वाजता सुटेल आणि कॅसल रॉक येथे त्याच दिवशी १६.३० वाजता पोहोचेल.
- ट्रेन क्र.17334 दि. २६ ऑगस्ट २०२२ पासून कॅसल रॉक येथून दररोज १७.०० वाजता सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी २३.४० वाजता पोहोचेल.
६) मिरज – लोंडा – मिरज
- ट्रेन क्रमांक 07351 एक्सप्रेस विशेष दि. २५ ऑगस्ट २०२२ पासून दररोज १९.१० वाजता मिरज येथून सुटेल आणि लोंडा येथे त्याच दिवशी २३.५५ वाजता पोहोचेल.
- ट्रेन क्र. 07352 एक्सप्रेस विशेष दि. २६ ऑगस्ट २०२२ पासून लोंडा येथून दररोज ०५.०० वाजता सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी ०९.४५ वाजता पोहोचेल.
वरील सर्व गाड्या मेल/एक्स्प्रेसच्या भाड्यानुसार अनारक्षित म्हणून धावतील. तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. असे आवाहन रेल्वेने केले आहे.
Join Our WhatsApp Community