शरद पवार ते एकनाथ शिंदे! ४४ वर्षांनंतर ‘त्या’ घटनेची पुनरावृत्ती!

92

भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी अचानक शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून जाहीर केले आणि राज्याच्या राजकारणात भाजपाने आणखी एक जोरदार धक्का दिला. शिवसेनेतून ४० आमदार फोडून एकनाथ शिंदे यांनी भाजपाशी संगनमत केले आणि भाजपाने शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले. महराष्ट्राच्या राजकारणात असाच ट्विस्ट ४४ वर्षांपूर्वी झाला होता आणि तो ट्विस्ट आताचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि १९७८साली काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी घडवून आणला होता.

(हेही वाचा औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामकरणाचा निर्णय अवैध! फडणवीसांचा दावा)

शरद पवारांनी 38 आमदारांचा नवा गट स्थापन केलेला 

एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणेच शरद पवार यांनी 1978 साली महाराष्ट्रात त्यांच्याच पक्षाचे काँग्रेसचे सरकार पाडले. त्यांनी काँग्रेसचे वसंतदादा पाटील सरकार पाडले आणि त्यानंतर ते स्वतः मुख्यमंत्री झाले होते. शरद पवार यांनी बंडखोरी करून काँग्रेसच्या ३८ आमदारांसह वेगळा गट स्थापन केला होता. त्यावेळी शरद पवार, गोविंदराव आदिक, प्रतापराव भोसले यांच्यासारखे लोक बंडाच्या अग्रभागी होते. आज शिवसेनेत फूट हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून दिसते आहे. तसेच बंडखोर शिवसैनिक राष्ट्रवादीच्या अपमानास्पद वागणुकीचा मुद्दा उपस्थित करत आहेत. 1978 मध्ये बंडखोरांना दिलेली मानहानीकारक वागणूक हेच त्यांनी सरकारपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेसचे (आय) उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे यांनी मुख्यमंत्री पाटील, शरद पवार आणि त्यांचे गुरू यशवंतराव चव्हाण यांच्यावर उघड टीका केली. पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांना न आवडलेल्या गोष्टी तिरुपडे बोलत होते. पवार हे वसंतदादा पाटील गटात मंत्री होते. विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना शरद पवार 18 जुलै 1978 रोजी राज्यपालांकडे गेले आणि त्यांनी आपल्या 38 आमदारांचा नवा गट स्थापन करण्याबाबतचे पत्र सादर केले. त्यांनी इतर पक्षांच्या पाठिंब्याबाबतचे पत्र आणि विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्याबाबत दुसरे पत्रही सादर केले. त्यानंतर राज्यपालांनी पवारांना मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचे निमंत्रण दिले. विधानसभेचे अधिवेशन सुरू असतानाही पवारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पवार यांच्या नेतृत्वाखालील (पुरोगामी लोकशाही आघाडी) आघाडीचे सरकार फार काळ टिकले नाही.

(हेही वाचा नगरसेवक ते मुख्यमंत्री : एकनाथ शिंदेंची २५ वर्षांची कारकीर्द)

एकनाथ शिंदेनी ४० आमदारांचा गट निर्माण केला 

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाआघाडी करून हिंदुत्वाच्या विचारांशी प्रतारणा केली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासह ४० शिवसेनेच्या आमदारांनी शिवसेनेने पुन्हा भाजपाशी युती करावी, या विचारासाठी ते महाराष्ट्राच्या बाहेर गेले. त्यानंतर शिंदे गटाने भाजपाशी चर्चा करून महाराष्ट्रात पर्यायी सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महाराष्ट्रात बरोबर ४४ वर्षांनी घडलेल्या प्रसंगाची दुरूक्ती झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.