मुंबई महापालिकेतील जेंडर बजेटच्या महिल व बालकल्याण योजनांच्या अंमलबजावणीसाठी ११ महिन्यांच्या कालावधीकरता कंत्राटी तत्वावर ११३ समुदाय संघटक पदे भरण्यासाठी मागवलेल्या अर्जा तब्बल ४२०० अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आता या पदाच्या एका जागेसाठी ३७ अर्ज प्राप्त झाल्याने उमेदवारांमध्ये मोठी स्पर्धा राहणार आहे.
( हेही वाचा : शरद पवार ते एकनाथ शिंदे! ४४ वर्षांनंतर ‘त्या’ घटनेची पुनरावृत्ती!)
महिन्याला २० हजार रुपये एवढे मानधन
मुंबई महापालिकेतील जेंडर बजेटच्या महिल व बालकल्याण योजनांच्या अंमलबजावणीसाठी ११ महिन्यांच्या कालावधीकरता कंत्राटी तत्वावर ११३ समुदाय संघटक पदे भरण्यासाठी महापालिकेच्यावतीने अर्ज २८ जून २०२२ पर्यंत हे अर्ज मागवले. दादर पश्चिम येथील हॉकर्स प्लाझा इमारतीतील सहायक आयुक्त(नियोजन) विभागाच्या कार्यालयात प्रत्यक्ष किंवा टपालाने अर्ज पाठवण्याचे आवाहन महापालिकेने केले होते. ही भरती कंत्राटी तत्वावर ठोक मानधनावर केली जाणार असून प्रत्येक महिन्याला २० हजार रुपये एवढे मानधन दिले जाणार होते.
तब्बल ४ हजार २०० अर्ज
अकरा महिन्यंच्या या ११३ कंत्राटी समुदाय संघटकांच्या पदांकरता तब्बल ४ हजार २०० अर्ज प्राप्त झाले असून लवकरच या सर्व अर्जांची छाननी करून यातून पात्र उमेदवारांची निवड यादी तयार केली जाईल तसेच यासाठीची प्रतीक्षा यादी तयार करून लवकरच प्रसिध्द केली जाईल,अशी माहिती विभागाकडून मिळत आहे.
Join Our WhatsApp Community