केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना खुशखबर देत आपल्या ८ हजार ८९ अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक नियमित पदोन्नती सहा वर्षांहून अधिक काळ प्रलंबित होत्या. शुक्रवारी केंद्रीय सचिवालय सेवा (CSS), केंद्रीय सचिवालय स्टेनोग्राफर्स सेवा (CSSS) आणि केंद्रीय सचिवालय लिपिक सेवा (CSCS)या विभागामधील ८ हजारांहून अधिक केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना मोठ्या प्रमाणावर पदोन्नती देण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. विशेष म्हणजे, CSS, CSSS आणि CSCS या तीनही सेवा केंद्रीय सचिवालयाच्या प्रशासकीय कामकाजातील महत्वपूर्ण सेवा आहेत.
पदोन्नती देण्याचे आदेश
कर्मचारी संघटनांमार्फत पदोन्नतीतील विलंबाविरोधात निदर्शने केली जात होती तसेच पदोन्नतीमध्ये विलंब झाल्यामुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान सुद्धा झाले आहे. यामुळेच कर्मचारी संघटनांनी कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या सचिवांना (DoPT) पत्र लिहिले होते. यानुसार हा पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
It was disheartening to see government employee attaining retirement from service without getting his due promotion.
Thanks PM @narendramodi ji for the kind decision….#DoPT orders mass promotion of more than 8,000 Central Govt Employees from #CSS, #CSSS & #CSCS cadres. pic.twitter.com/LVLNAX61gu— Dr Jitendra Singh (@DrJitendraSingh) July 1, 2022
केंद्रीय सचिवालय सेवा (CSS) – ४ हजार ७३४ पदे
- ३२७ संचालक पदावर पदोन्नती
- १ हजार ९७ उपसचिव पदावर पदोन्नती
- १ हजार ४७२ विभाग अधिकाऱ्यांच्या पदावर पदोन्नती
केंद्रीय सचिवालय स्टेनोग्राफर्स सर्व्हिस (CSSS) २ हजार ९६६ अधिकाऱ्यांना पदोन्नती
केंद्रीय सचिवालय लिपिक सेवा (CSCS) ३८९ कर्मचाऱ्यांना पदोन्नती
Join Our WhatsApp Community