एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानतंर, या नव्या सरकारला बहुमत चाचणी करण्याचे आदेश राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिले. त्यानुसार विशेष अधिवेशन ठेवण्यात आले आहे. या अधिवेशनाच्या सुरुवातीला विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येणार आहे. निवडणूकीसाठी भाजपने राहुल नार्वेकर तर महाविकास आघडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
( हेही वाचा: एकनाथ शिंदेंविरोधात केलेल्या कारवाईला कायद्याने उत्तर देणार; दीपक केसरकरांचा शिवसेनेला इशारा )
साळवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब
शनिवार दुपारी १२ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. त्याआधी अवघे काही मिनीटं राहिली असताना राजन साळवी यांनी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार चेतन विठ्ठल तुपे हे सुचक, तर काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे हे अनुमोदक होते. याआधी काँग्रेसकडून संग्राम थोपटे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. मविआ सरकार असताना थोपटेच विधानसभा अध्यक्ष होतील, असे सांगितले जात होते. तिन्ही पक्षांतील बैठकीअंती साळवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. तर दुसरीकडे विधानसभा विरोधी पक्षनेते पदावर आता राष्ट्रवादी काॅंग्रेसने दावा केला आहे.
Join Our WhatsApp Community