45 लाखांची स्कॉलरशिप मिळवणारा ‘दीपक चटप’ देशातील पहिला वकील

124

कोरपना तालुक्यामधील लखमापूर येथील शेतकरी कुटुंबातील अॅड. दीपक यादवराव चटप हा ब्रिटिश सरकारचा ‘चेव्हनिंग ग्लोबल लीडर’ ठरला असून, ‘चेव्हनिंग’ या जागतिक प्रतिष्ठेच्या 45 लाखांची शिष्यवृत्ती मिळवणारा तो देशातील पहिला तरुण वकील आहे.

सामाजिक नेतृत्व करु इच्छिणा-या जगभरातील युवकांना ब्रिटिश सरकार शिष्यवृत्ती देते. लंडनच्या ‘सोएस’ या सर्वोत्तम विद्यापीठात उच्चशिक्षणासाठी अॅड. दीपक चटप याची निवड झाली. अॅड. चटप हा पाथ या सामाजिक संस्थेचा संस्थापक असून, दुर्बल घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करत आहे. शेतकरी नेते अॅड. वामनराव चटप, पद्मश्री डाॅ. अभय बंग, अॅड. असीम सरोदे व माजी मंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत सामाजिक व विधिविषयक केलेले दीपकचे काम दखलपात्र ठरले.

( हेही वाचा: उमेश कोल्हे हत्याप्रकरणाला नवे वळण; मित्रानेच रचला हत्येचा कट  )

म्हणून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलो

लखमापूर ते लंडन हा प्रवास सोपा नव्हता. मात्र, कुटुंब व मित्रांनी खंबीर साथ दिल्याने ब्रिटिश सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरु शकलो. लंडनमध्ये उच्चशिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतात परत येऊन शेतकरी, आदिवासी व दुर्बल घटकांच्या न्याय्यहक्कांसाठी कार्य करणार असल्याचे अॅड. दीपक चटप म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.