Maharashtra Assembly session: ‘मविआ’ला आणखी एक धक्का, ९ मतं झाली कमी

109

सोमवारी सकाळी ११ वाजता विधान भवनात बहुमत चाचणीला सुरुवात झाली. यामध्ये शिंदे-भाजप आघाडीने १६४ मतं मिळवत विजय मिळवला आहे. राज्यात सत्तेत असलेल्या शिंदे-भाजप सरकारने सोमवारी झालेला विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. त्यामुळे आता शिंदे-भाजप सरकारला अधिकृतरित्या मान्यता मिळाली आहे.

(हेही वाचा – शिंदे-भाजप सरकारवर शिक्कामोर्तब, जिंकला विश्वासदर्शक ठराव)

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक चर्चेचा विषय ठरत होती, त्यामध्ये भाजपने १६४ मतं मिळवत बाजी मारली. मात्र कालच्या तुलनेत महाविकास आाघाडी म्हणजेच विरोधी पक्षाकडे ९ मतांची कमतरता दिसली. सोमवारी झालेल्या शिरगणती मतदानास महाविकास आघाडीकडे १०७ मतं होती मात्र आज विरोधी पक्षाकडे कालच्या तुलनेत ९ मतं कमी दिसली.

असे झाले मतदान

बहुमताच्या चाचणीत शिंदे-भाजप आघाडीने १६४ मतं मिळवली आहेत. तर महाविकास आघाडीच्या पारड्यात केवळ ९९ मतं पडली आहेत. यामध्ये एमआयएम आणि समाजवादी पक्षाच्या एकूण तीन आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली आहे. तर रविवारी झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर निवडून आले. तर त्यांनी शिवसेनेच्या राजन साळवी यांचा पराभव केला आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नार्वेकरांना १६४ तर राजन साळवींना १०७ मतं मिळाली. तर रईस शेख, अबू आझमी आणि फारूख अन्वर या तीन आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.